अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर:- सावनेर नगर परिषद अंतर्गत येणाऱ्या श्रीलेला बहुउद्देशीय संस्था चंद्रपूर द्वारा संचालित सावनेर पब्लिक स्कूल गुजरखेडी सावनेर येथील सीबीएसई च्या विद्यार्थ्यांने ट्रायथलॉन स्पर्धेत उत्कृष्ट भरारी घेत यश प्राप्त केले.
तुषार सुधाकर बनसोड वर्ग ८ वी याने स्पोर्ट चेंज ६ वी एडिशन नॉर्थ झोन चॅम्पियनशिप २०२४ ग्रेटर नोएडा दिल्ली येथे ५ ते ६ जुलै दरम्यान पार पडलेल्या १४ वर्षाखालील मुलांमध्ये मध्ये ट्रायथलॉन स्पर्धेत १६७८ गुण घेऊन तिसरा क्रमांक पटकावल्यामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
विद्यार्थ्यांना मिळालेल्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. अशोक जिवतोडे, सचिव, डॉ. प्रतिभा जीवतोडे, संस्थेचे संचालक रत्नाकरजी डहाके (पाटील) तसेच प्राचार्या ममता अग्रवाल, वैशाली देशपांडे, शिक्षक चंद्रकांत कोमुजवार, अक्षय घोरमारे, नितिन दोरखंडे सर व सर्व शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद, यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

