मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील पुलगाव येथून एक लव्ह जिहादच खळबळजनक प्रकरण समोर आल्याने संपूर्ण जिल्हात खळबळ माजली आहे. हिंदू नावाने ओळख सांगत मुस्लिम समाजातील युवकाने हिंदू मुलीशी लग्न केले. त्यानंतर तिच्यावर धर्मांतराची जबरदस्ती केली. यावेळी मुलीने धर्मांतराला नकार देताच तिला मारहाण करून समृद्धी महामार्गावर फेकण्यात आले.
त्यात धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणी पुलगाव पोलिसांनी पीडितेची तक्रार दाखल करून घेतली नाही. पुलगावात घडलेल्या लव्ह जिहाद प्रकरणात पोलिसांनी दोषी युवकाला अटक करावी आणि अधिकाऱ्यांची दिशाभूल करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करावी अशी मागणी खासदार अनिल बोंडे यांनी पत्रकार परिषदेत केली.
काय आहे ही घटना… पुलगाव येथील एका तरुणीची समाज माध्यम असलेल्या फेसबुकवरून संचित अग्रवाल नामक तरुणाशी ओळख झाली. यातून दोघांचे प्रेम संबंध फुलले. त्यानंतर या दोन्ही प्रेमी युगुलानी वर्धेत येत मंदिरात लग्न केले. लग्नानंतर काही कारण काढून सदर तरुण पुलगाव येथे त्या युवतीच्या घरी राहू लागला. अशात एक दिवस तो घरी लपून नमाज पठण करताना दिसला. यावरून तो हिंदू नसल्याचे पुढे आले. त्याला विचारणा केली असता त्याने दंगे घडण्याचे कारण आणि कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिली.
अशात तो दुसऱ्या मुलीशी विवाह करणार असल्याचे पुढे आल्याने सदर युवती पोलिसात तक्रार दाखल करण्याकरिता गेली. मात्र, पोलिसांकडून तिला सहकार्य मिळाले नसल्याचा आरोप खासदार बोंडे यांच्यासह पीडितेने यावेळी केला. लग्नाच्या कारणानंतर सदर युवतीने त्याला भेटायला बोलावले असता त्याने एकट्यात भेटायचे म्हणून तिला बडनेरा येथे नेले. वाहनात तिला बुरखा घालण्यास सांगून तिचा धर्म परिवर्तन करण्याचा घाट घातला.
यावेळी तरुणीने धर्म परिवर्तन करण्यास नकार दिल्यानंतर तिला जबर मारहाण करून समृद्धी महामार्गावर फेकण्यात आले. येथून ती कशीबशी पुलगावात आल्यानंतर पोलिसात तक्रार दाखल करण्याकरिता गेली असता पोलिसांनी तिची तक्रार घेतली नसल्याचा आरोपही यावेळी पीडितेसह खासदार बोंडे यांनी केला.पत्रकार परिषदेला भाजप जिल्हाध्यक्ष सुनील गफाट, राजेश बकाने, वैशाली येरावार यांची उपस्थिती होती.
सोबत राहण्याची नोटरी: पीडिता आणि यातील युवक या दोघांनी २०२४ मध्ये सोबत राहण्याची नोटरी केली. ती दोन महिन्याची गर्भवती होती आणि तिच्या कुटुंबीयांना मारण्याची धमकी देण्यात आल्याने यावर स्वाक्षरी केल्याचे पीडितेने यावेळी सांगितले.