उत्तर नागपूरात विकास कामांचा सुकाळ राज्य सरकार मुळे; विकास कामात दुजाभाव केल्याचा आरोप आमदार डॉ. नितीन राऊत यांनी केला.
पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपुर
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- 23 सप्टेंबर 2023 रोजी नागपुरात झालेल्या पावसामुळे हाहा:कार उडाला होता. ढगफुटी सदृश्य झालेल्या या पावसामुळे नागपूरकर हवालदिल झाले असता शहरात ठिकठिकाणी पाणी भरल्यामुळे आणीबाणी सारखी परिस्थिती निर्माण झाली होती. उत्तर नागपूर मतदार संघातही ढगफुटीमुळे नुकसान झाले होते. परंतू नागपूर महानगर पालिका आणि नागपूर सुधार प्रन्यास विकास कामात दुजाभाव करीत असल्याने ते एका पक्षाचे कार्यालय म्हणून कार्य करीत असल्याचा आरोप आज सभागृहात राज्याचे माजी मंत्री आणि उत्तर नागपूरचे आमदार डॉ. नितीन राऊत यांनी केला.
23 सप्टेंबर ला नागपूर शहरात 111 मिलिमीटर झालेल्या अतिवृष्टीमुळे नागपूर शहराच्या विविध ठिकाणी पुराच्या पाण्या मुळे नाल्याची सुरक्षा भिंत, मुख्यमल वहीका व अनेक रस्ते खराब झालेले होते यात उत्तर नागपूर विधानसभा क्षेत्रातील अनेक भाग प्रभावित झाले असून मी स्वतः पिवळी नदी परिसर, मार्टिन नगर, समता नगर, कामगार नगर, विनोबा भावे नगर चौक, कुशीनगर, शिवनगर व इतर भागात परिसराची मी प्रत्यक्ष पाहणी केली होती. पूर परिस्थितीत नागरिकांच्या घरात ही पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असल्याचे यावेळी डॉ. राऊत यांनी सांगितले.
विशेष म्हणजे नागपूर महापालिकेत सध्या प्रशासकीय राजवट असून महापालिका आयुक्त आणि नासुप्र सभापती काही ठराविक मतदार संघात निधीची तरतूद करीत असल्याचा आरोप काँग्रेस आमदार डॉ. नितीन राऊत यांनी केला आहे. उत्तर नागपुरातील सामान्य जनतेला निधीच्या अभावत पावसात खडतर मार्गांवरून प्रवास करावा लागत आहे हे सरकारचे अपयश आहे. केंद्र आणि राज्य सरकार नागपुरातून चालते, असा आव आणतात. पण त्या शहराकडे दुर्लक्ष झाले आहे. भाजपने १७ वर्षे नागपूर महापालिकेत सत्ता भोगली आहे. परंतु यांनी नागपूरचा विकास नाही भकास आणि विनाश केले असल्याची टीका आमदार डॉ. नितीन राऊत यांनी केली.
नाल्याची सुरक्षा भिंत आणि रस्ते बांधण्याची मागणी: पावसाळ्यापूर्वी पिवळी नदी आणि चांभार नाल्यावरील सुरक्षाभिंतीचे बांधकाम करण्यात यावे. तसेच उत्तर नागपुरात रस्त्याचे बांधकाम आणि दुरुस्ती व मलवाहीका टाकण्याचे कामे करण्याची विनंती उत्तर नागपूरचे आमदार डॉ. नितीन राऊत यांनी सभागृहात केली. राज्य सरकार निधी वितरित करतांना दुजाभाव करीत असल्याने उत्तर नागपुरात विकासकामाचा सुकाळ असल्याची परिस्थिती आहे. उत्तर नागपूरातील नागरिकांच्या मूलभूत सुविधांकडे महानगर पालिका आणि नागपूर सुधार प्रन्यास दुर्लक्ष करीत असल्याचा आरोपी आमदार डॉ. नितीन राऊत यांनी केला आहे.
अंबाझरीतील वाहतूक कोंडी सोडविण्यास पोलिसांना अपयश: यावेळी सभागृहात प्रश्न मांडताना नागपूर अंबाझरी तलावापुढील पुलाच्या रूंदीकरणाचे काम सुरू असल्याने येथील रस्ता बंद करण्यात आलेला आहे. परिणामी देण्यात आलेला पर्यायी मार्ग अरूंद असल्याने याठिकाणी वाहतुकीचा खोळंबा रोजचे झाले आहे. अंबाझरी टी पॉईंट ते विवेकानंद स्मारक दरम्यानचा मार्ग बंद केले गेले आहे. वाहतूक कोंडी सोडविण्यास पोलीस प्रशासनाला अपयश येत आहे. गोपाल नगर, सुभाष नगर, दीक्षाभूमी, प्रताप नगर, शंकर नगर चौक, एलएडी कॉलेज चौक, बजाज नगर, अंबाझरी लेआऊट, डागा लेआऊट, अभ्यंकरनगर चौक, विश्वेश्वरय्या चौक, दीनदयाल चौका तिल रस्ते बंद असल्याने येथील परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. प्रसंगी अंबाझरी मार्ग सुरू होईपर्यंत या मार्गाने जाणाऱ्या जड वाहनांकरिता वाहतूक बंद करण्यात यावी. तसेच व्हीएनआयटी येथील प्रवेशद्वार उघडल्यास नागरिकांनाने सोयीचे ठरत असल्यामुळे हे प्रवेशद्वार उघडण्याची मागणी माजी मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी राज्य शासनाला केली आहे. प्रसंगी हा मतदार संघ उपमुख्यमंत्र्यांच्या असल्याने त्यांनी याकडे लक्ष द्यावे असेही यावेळी आमदार डॉ. नितीन राऊत म्हणालेत.
नागपूर शहरात ढगफुटी सदृश्य स्थिती निर्माण होऊन पाऊस झाल्यामुळे नागपूर शहरात अंबाझरी तलाव ओवर फुल्ल होऊन शहरातील सखल भागात तसेच नागरी वस्ती मध्ये १० फूट पाणी लोकांच्या घरात पाणी शिरले होते. सदर ठिकाणी तलाव लगत स्वामी विवेकानंद यांचा २० फुट उंच पुतळा उभारला असल्यामुळे तलावाचे पाणी नागरीवस्त्यामध्ये शिरले होते. त्यामुळे याघटनेत ५ नागरिकांना जीव गमवावा लागला होता. अशीच परिस्थिती वर्ष २०१९ च्या हिवाळी अधिवेशन सुरु असतांना निर्माण झाली होती. या संदर्भात स्थानिक नागरीकांनी भविष्यात पुराची स्थिती निर्माण होऊ नये म्हणुन स्वामी विवेकानंद यांचा पुतळा हाटविण्याबाबत शासनास कळविले होते. मात्र शासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. यासंदर्भात न्यायालयात याचिका देखील दाखल करण्यात आली आहे.
जलसंपदा विभागाने देखील अंबाझरी तलावच्या ५० मीटर च्या आत कुठलेही विकास कार्य करता येणार नाही, असा शासन निर्णय काढला, परंतू शासनाने सर्व नियम बाजूला ठेवून तलावाला लागून स्वामी विवेकानंद स्मारकाचे बांधकाम केले, तसेच मुरारका डेव्हलपर्स ने कोणत्या नियमाने याठिकाणी बांधकाम केले या बांधकामांना कोणी परवानगी दिली. यावर चौकशी होऊन कारवाई होणार काय? पुतळा वाचवणे महत्वाचे कि लोकांचा जीव वाचविणे महत्वाचे?असा प्रश्न आमदार डॉ. नितीन राऊत यांनी सभागृहात उपस्थित केला.