युवराज मेश्राम, प्रधान संपादक
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन अमरावती:- विदर्भ शाहीर कलाकार परिषद तालुका सभा शेंदुरजनाघाट येथील दत्तमंदिर सभागृहात परिषदे चे केंद्रीय अध्यक्ष मणीष भिवगडे यांच्या अध्यक्षतेखाली व केंद्रीय कार्याध्यक्ष अलंकार टेंभूर्णे. विदर्भ संघटक शाहीर अरुणभाऊ सहारे, विदर्भ महिला प्रमुख संगीता भक्क्ते यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली. या प्रसंगी प्रसिद्धी प्रमुख व महाराष्ट्र न्यूज चॅनलचे प्रधान संपादक युवराज मेश्राम, नागपूर जिल्हा सरचिटणीस अरूण वाहाणे, नागपूर जिल्हा महिला प्रमुख माया गणोरकर यांनी परिवर्तनवादी महापुरूषांच्या प्रतिमेचे पूजन करून कलावंतांच्या समस्या विषयी आप आपले विचार व्यक्त केले.
ग्रामीण भागातील कलावंताला त्यांच्या हक्काचे कलापीठ देऊन कलावंतांची कैफियत शासन दरबारी मांडून मानधना सह अनेक सुविधा त्यांना मिळवून देण्यासाठी आमची कलावंत परिषद कटीबद्ध आहे. असे परखड वक्तव्य अलंकार टेंभूर्णे यांनी या प्रसंगी मांडले. यावेळी अध्यक्षीय भाषणात मणीष भिवगडे म्हणाले की, कलावंतांच्या आर्थिक सामाजिक विकासा करीता कलावंत शाहीर परिषद हे काम करीत आहे. तुम्ही कलावंत आहात हे शासनाला कसे कळेल. म्हणून संघटन महत्वाचे आहे. स्वतःसाठी जगा त्याच बरोबर इतरांसाठी ही जगा. असे मार्गदर्शन त्यांनी केले.
सभेचे सुत्रसंचलन गायक अरुणभाऊ सहारे कळमेश्वर यांनी उत्कृष्ट रित्या केले. वरूड तालुका कार्यकारिणी नामांकन द्वारा घोषित करण्यात आली. वरूड तालुका कार्याध्यक्षा पदी तडफदार कार्यकर्ता संदिप शेगेकर तर अध्यक्ष पदी प्रबोधन किर्तनकार व संगीतकार सचिन चौधरी व सचिव पदी गणेश शेठिये, कोषाध्यक्ष किशोर चिमोटे, सहसचिव पदी देवरथ नागले यांची नियुक्ती करण्यात आली. तर कार्यकारणी सदस्य म्हणून योगेश बिसांद्र भुषण कोरडे, अरविंद पंचभाई, गोपाल आजनकर, दिवाकर वरोकर, बाबाराव ठाकरे, भास्कर बानाईत, गंगाधर गोरडे, गजेंद्र रडके, रमेश बांदरे, एकनाथ वरोकर, गोपाल गडलिंग, सुभाष सावरकर, महेश लिखितकर इत्यादीं ची सदस्य पदी नियुक्ती करण्यात आली.
यावेळी नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा सत्कार पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच महिला कार्यकारणी अध्यक्षा गायीका संध्याताई अकर्ते, उपाध्यक्ष छायाताई शेगेकर, सचिव गायीका स़ूनिताताई दवंडे, सहसचिव निर्मलाताई घोरपडे, कोषाध्यक्ष कंठाबाई केवटे, महिला प्रतिनिधी शांताबाई गायकी, लिला दवंडे, पद्ममा माळोदे, पुष्पा गोरडे, वर्षा सावरकर, कमला दवंडे, सुमन दुपारे, राजकन्या वरोकर, विमल दवंडे, रेखा वरोकर, अस्मिता वाहणे, रेखा बागडे, शालू खोब्रागडे, शिला बागडे, प्रमिला गायकवाड, प्रमिला वाहणे, लता कळसकर, शोभा वानखेडे, लक्ष्मी पंधराम, सुनंदा चौधरी, देवकु आंबूलकर, सूनंदा दाभाडे, भाग्यश्री काळे, नंदा नागले, ललिता डोंगरे, उज्वला खडसे, सिमा खंडारे, उषा वानखडे, वच्छला कठाळे, गीता पातूरकर, कांता केवटे, संगीता टाकरखेडे, प्रमिला काढे, अनिता बोथे, रंजना बागडे ईत्यादी कलावंत महिला सहभागी होऊन सदस्य झाल्या. पाहुण्यांचे हस्ते पदाधिकारी कलावंत महिलांचे पुष्प गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संदिप शेगोकर यांनी केले. गोपाल पाटील (मलकापूर) यांच्या सहकार्य बद्दल त्यांचे ही आभार मानले.कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी संदिप शेगेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी अथक परिश्रम करून कार्यक्रम यशस्वी पणे पार पडला.