हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बल्लारपूर:- दि 18 जुलै रोजी शहरातील नगर परिषदेतील अधिकाऱ्यांच्या कार्यप्रणाली बाबत आम आदमी पक्षातर्फे मागील एप्रिल महिन्यात उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी कोणतीही दखल घेतली नाही. पुन्हा जुलै च्या पहिल्या आठवड्यात यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन योग्य कारवाई करण्याबाबत निवेदन दिले.
बल्लारपूर नगरपरिषदेत मुख्याधिकाऱ्यांचा मनमानी कारभार सुरू आहे. अनियमितपणे कर्मचाऱ्यांमध्ये अधिकारांचे वाटप करण्यात आले आहे. थेट वर्ग 4 चे कर्मचारी विभागप्रमुख बनवले गेले आहेत व त्यांच्या हाताखाली वर्ग 3 चे कर्मचारी काम करत आहेत. अनेक विभागात लिपिक नाही, उप मुख्याधिकारी यांना काही माहीत नाही नागरिकांची गैरसोय होत आहेत. बदली विना अनेक अधिकारी वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी नोकरीला आहेत. पुर्वी शिक्षण विभागाची जबाबदारी प्रवासकिय अधिकाऱ्यांकडे राहत असे परंतु आता हि जबाबदारी एका शिक्षकाकडे सोपविण्यात आली आहे. आधीच शिक्षकांची संख्या कमी आहे. तर शिक्षकांनी शिकवायचे कि इतर जबाबदारी सांभाळची. हि सर्व तक्रार त्या निवेदनात करण्यात आली.
तरीही दोनदा निवेदन देऊनही जिल्हाधिकाऱ्यांनी अजूनही कोणतीच कारवाई केली नाही. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी इतक्या गंभीर प्रश्नाबाबत दुर्लक्ष करने फारच दुर्दैवी असल्याचे रविभाऊ पुप्पलवार यांनी म्हटले. यासोबतच प्रशासक म्हणून असलेले मुख्याधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराला जिल्हाधिकाऱ्यांचे समर्थन आहे का? अनेक वर्षांपासून नगरपरिषदेतील अधिकाऱ्यांची बदली का झालेली नाही? असे प्रश्न आपचे शहराध्यक्ष रविभाऊ पुप्पलवार यांनी उपस्थित केले आहे.