संतोष मेश्राम, राजुरा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- इन्फंट जीजस सोसायटी राजुरा द्वारा संचालित इन्फंट जीजस इंग्लिश हायस्कूल येथे विद्यार्थ्यांच्या शालेय मंत्रिमंडळाचा पदग्रहण सोहळा थाटात संपन्न झाला. विद्यार्थी परिषदेची निवडणूक दिनांक 13 जुलै 2024 ला मतदान पद्धतीने घेऊन यामध्ये मतदान वर्ग 5 ते 10 वी वर्गातील विद्यार्थ्यांनी केले शाळेच्या सर्वांगीण विकासाला मदत करण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुण रुजवण्यासाठी विद्यार्थी प्रतिनिधी लोकशाही पद्धतीने निवडण्यात आले.
या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने आणि शालेय प्रार्थनेने करण्यात आली. यामध्ये इन्फंट शाळेच्या सीबीएसई व स्टेट शाळेतून विविध मंत्रीमंडळाची पदग्रहण स्वीकारणारे हेडबॉय कृष्णा मोहितकर आरिज खान पठाण, हेड गर्ल्स क्रांती लिहितकर, यशिका चौधरी, पंतप्रधान अलेश देठे, विशाल वाघमारे, शिक्षणमंत्री अंश गुरले, घनश्याम उलमाले, क्रीडामंत्री मेहनुर काजी, तेजस ताजणे, आरोग्यमंत्री ओम काळे, आयुष्य बोबडे, सांस्कृतिक मंत्री सोहम घट्टुवार, मयुरी धानोरकर, पर्यटक मंत्री हर्षल गौरकार, जान्सी चापले, कौस्तुभ रागीट, वंशिका आक्केवार आणि स्वच्छता मंत्री समीर बोडेकर, पार्थ मडावी या विद्यार्थ्यांना शपथविधी मुख्याध्यापिका सिमरनकौर भंगू यांनी दिली. आणि मार्गदर्शन मुख्याध्यापिका मंजुषा अलोने यांनी केले. तर विद्यार्थी प्रतिनिधींनीही आपले मत मांडले.
यावेळी शालेय मंत्रिमंडळाच्या सर्व नवनियुक्त विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष आमदार सुभाष धोटे, सचिव, माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, संस्थेचे संचालक अभिजीत धोटे, मुख्याध्यापिका मंजुषा अलोने, मुख्याध्यापिका सिमररकौर भंगू व विद्यार्थी प्रतिनिधी निवडणुकीचे प्रमुख उमेश लढी, शोएब शेख, रामकली शुक्ला, नसीम मॅडम, सुधीर सर यासह सर्व शिक्षक व शिक्षेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष सागर यांनी केले.