विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- दिनांक १९/०७/२०२४ रोजी नगरपंचायतीच्या कार्यालयात फॉर्म्स फॉर फॉरेस्ट आणि क्लीन मॅक्स उर्जीत एल एल पी यांच्या संयुक्त विद्यमानाने सुधारित कुकस्टोव्ह वितरण उपक्रमा संदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
सदर उपक्रमा बद्दल क्लीन मॅक्स उर्जीत एल.एल.पी. चे श्री संदीप सहा व फॉर्म्स फॉर फॉरेस्टचे अश्विन पारमार यांनी सुधारित कुकस्टोव्हची माहिती देताना म्हणाले पारंपरिक स्टोव्ह मधून स्वयंपाक करताना निर्माण होणारा घातक धूर कमी करून स्थानिक ग्रामस्थ, विशेषतः महिला आणि मुलांचे आरोग्य सुधारते व लाकडाचा वापर कमी होते. जे अप्रत्यक्षपणे जवळच्या स्थानिकांचे संरक्षण करण्यास मदत करते. जंगले पुढे यशस्वी अंमलबजावणीनंतर, प्रकल्पामुळे वातावरणातील हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी होईल आणि त्यामुळे जागतिक तापमान वाढीचा सामना करण्याचा जागतिक प्रयत्नांना हातभार लागेल अशी माहिती त्यांनी दिली. तसेच या बैठकीचे संचालन समर्पण संस्थेचे सचिव अमोल गजाडीवार यांनी केले व आभार प्रदर्शन फॉर्म्स फॉर फॉरेस्टचे अंकित दिकोंडवार यांनी केले.
सदर बैठकीला प्रमुख पाहुणे म्हणून सौ.दिपयंती निजान पेंदाम नगराध्यक्षा नगरपंचायत एटापल्ली व राघवेंद्र सुल्वावार बांधकाम सभापती नगर पंचायत एटापल्ली हे होते. याप्रसंगी निजान पेंदाम नगरसेवक, राहुल कुळमेथे नगरसेवक, निर्मला कोंडबतुलवार नगरसेविका, निर्मला हिचामी नगरसेविका, रेखा मोहूर्ले नगरसेविका, सरिता गावडे नगरसेविका तसेच नगरपंचायत एटापल्ली येथील कर्मचारी ग्रामस्थ उपस्तीत होते.