उषाताई कांबळे प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- मातोश्री रमाई बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त स्वयंदीप सोशल फाउंडेशन पुणे यांच्या वतीने ज्ञानज्योती मुलींची निवासी अभ्यासिका स्थापन करण्यात आली. या अभ्यासिकेत ग्रामीण भागातील आर्थिक व सामाजिक दृष्ट्या दुर्बल घटकातील 15 मुली असून राहणे, भोजन, स्पर्धा परीक्षेसाठी लागणारे साहित्य संस्थेकडून मोफत देण्यात येणार आहे.
स्वयंदीप सोशल फाउंडेशन पुणे यांच्या वतीने ज्ञानज्योती मुलींची निवासी अभ्यासिकाचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी स्वयंदीप सोशल फाउंडेशन पदाधिकारी यांनी म्हटल की, आम्हाला आपल्या सर्वांना कळविण्यास अत्यंत आनंद होतो की , अभ्यासिकेतील पल्लवी प्रधान या विद्यार्थिनीचे जिल्हा परिषद आरोग्य विभागात निवड झाली असून पुढील आठवड्यात कामावर रुजू होणार आहे. आज पल्लवीचां छोटासा कौतुक व सत्कार सोहळा सरिता यादव (API) नागपूर यांच्या हस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या प्रथम विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला आयु. पल्लवी यांनी पुष्पहार अर्पण करून सर्वांनी बाबासाहेबांना वंदन केले. यावेळी आयु. सरिता यादव (API) यांनी मुलींना स्पर्धा परीक्षे संदर्भात मार्गदर्शन केले. त्यानंतर संस्थेच्या वतीने निरोप समारंभ संपन्न झाला.