अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- वर्धा जिल्ह्यात शासनाने घोषित केलेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागे संदर्भात कुठलीही निर्णय झाला नसल्याने आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहे. त्यात आज पासून हिंगणघाट मेडिकल कॉलेज संघर्ष समिती द्वारा उपविभागीय अधिकारी कार्यालया समोर महिलांचे अन्नत्याग आंदोलन करण्यात येत आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाट येथे व्हावे याकरिता शासन निर्णय झाला असून गेल्या सात महिन्यापासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागे करिता जागा प्रस्तावित झाली असूनही या जागे संदर्भात मोठा पेच निर्माण झाला आहे. लवकरात लवकर या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी हिंगणघाट मेडिकल कॉलेज संघर्ष समिती द्वारा विविध प्रकारचा उपोषणाचा इशारा देण्यात आला होता. त्यात आज पासून महिलांनी अन्न त्याग आंदोलन सुरू केली आहे.
या संदर्भात आज पासून हिंगणघाट मेडिकल कॉलेज संघर्ष समितीच्या महिला समितीच्या सुजाता जांभुळकर, सुनिता तामगाडगे व सुजाता जीवनकर या महिलांनी अन्न त्याग आंदोलनाची उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर सुरुवात केली आहे. यावेळी या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी माजी आमदार प्रा राजू तीमांडे, प्रहारचे गजु कुबडे, पिंपळकर गुरुजी रागिणी शेंडे, सुरेंद्र बोरकर सह अनेक कार्यकर्ते महिला उपस्थित होत्या.