अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- विश्व सिंधी सेवा संगम द्वारा समाजातील किशोरावस्था मुली साठी समस्या-समाधान शिविराचे आयोजन गोदड़ी वाला धाम येथे करण्यात आले. ज्यामध्ये डॉक्टर रिया गोपवानी साइकैट्रिस्ट नागपुर यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात अतिथि म्हणून राखी ज्ञानचंदानी, अध्यक्ष दिशा शर्मा, उपाध्यक्ष माया मिहानी यांची मंच वर उपस्थिती होती.
या कार्यक्रमाची शुरुआत झूलेलाल साईं यांची पूजा आणि आरती करून करण्यात आली. सर्वप्रथम अध्यक्ष दिशा शर्मा यांनी या शिविर आयोजनाचे उद्देश्य सागून आज मुलींना सुरक्षा आणि मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. कारण किशोरावस्था मध्ये मुल आणि मुली भटकून जाते.
आपल्याला त्यांना सांभाळायचे आहे.
त्यानंतर उपाध्यक्ष माया मिहानी यांनी किशोरावस्था मध्ये मोबाइलच्या अती उपयोग मुळे ते चुकीच्या मार्गावर वर जात आहे. माता आणि मुली मधे मित्रता चे संबंध बनले पाहिजे, असे प्रतिपादन केले. राखी ज्ञानचंदानी ने स्वतःच्या आणि समाजा तील अन्य मुलाचे उदाहरण देउन, मुलीनी योग्य प्रकारे अभ्यास केला तर ते प्रगती करू शकतो, असे प्रतिपादन केले.
यावी डॉ. रिया गोपवानी यांनी मुली आणि माता ना मार्गदर्शन करताना सागितले की, दैनिक दिनचर्या मधे मोबाइलचा कमी उपयोग करून वेळेचा सदुपयोग केला पाहिजे रोज अर्धा तास व्यायाम केला पाहिजे, नियमित अभ्यास केला पाहिजे. जेवण करते वेळी मोबाइलचा उपयोग केला नाही पाहिजे आणि लहान सहान गोष्टीच डोक्यावर स्ट्रेस नाही घेतला पाहिजे. मुलींनी प्रत्येक गोष्ट आपल्या आई सोबत शेयर केली पाहिजे आणि आईने देखील त्यांच्या वर न रागावता संवाद साधला पाहिजे. त्यानंतर प्रश्नोत्तर सत्र मधे आई आणि मुलींनी विचारलेल्या प्रश्नांना डॉक्टर रिया यानी उत्तर देऊन त्यांचे समाधान केले. या शिविरचां समाजातील अनेक माता आणि मुलींनी लाभ घेतला.
या कार्यक्रम संचालन डाॅ. रेखा कटारिया यांनी तर आभार तन्वी मोटवानी ने मानले. या कार्यक्रम सफलतेसाठी युवा टीमचे विकी तख्तानी, मोहित शर्मा आणि सहकारी, वीएसएसएस चे सदस्य उषा चंदानी, सुनिता खिलवानी, कंचन चंदानी, सोनल सामतानी, वीणा खिलवानी, निशा गुरनानी, आशा पाखरानी, कांता चंदानी आदि ने प्रयास केले.