मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- नियोजित असलेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उपजिल्हा रुग्णालय मागील 41 एकर जागेमध्येच झाले पाहिजे या मागणीसाठी माजी आमदार प्रा. राजू तिमांडे यांनी तातडीने वर्धेचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची दिनांक २२ जुलैला भेट घेऊन चर्चा केली असता आपण उपजिल्हा रुग्णालय मागील 41 एकर जागेची पाहणी करण्यासाठी यावे आम्ही सर्व संघर्ष समिती तुम्हाला आराखडा लक्षात आणून देऊ व संपूर्ण जागेची माहिती “स्पॉट विझिट” दरम्यान लक्षात आणून मोकळी जागा आहे अथवा नाही हे लक्षात आणून देवु अर्थातच जागा उपलब्ध नाही असे गाजावाजा करणारे तिथेच “दूध का दूध पाणी का पाणी”करून देऊ असा आग्रह धरला.
यावेळी जिल्हाधिकारी यांनी संघर्ष समिती शिष्ट मंडळ याना होकार देत उपजिल्हा रुग्णालय मागील 41 एकर जागेची पाहणी करण्यासाठी दिनांक 24 जुलैला येणार आहे असे आश्वासन दिले. त्यावेळी चर्चेदरम्यान माजी आमदार प्रा राजु तिमांडे,माजी नगराध्यक्ष पंढरी कापसे, सुरेंद्र बोरकर, वासुदेव पडवे, संदेश मुन आदी उपस्थित होते.