युवराज मेश्राम प्रधान संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा तिसरा विकसित भारताचा निराशाजनक बोगस व लोकांना न पटणारा, उत्पन्न घटवनारा दिशाहीन, अपेक्षाभंग करणारा अर्थसंकल्प आहे. असे उदगार माजी आमदार प्रकाश गजभिये यांनी व्यक्त केले.
माजी आमदार प्रकाश गजभिये पुढे बोलले की, लोकांची 7 लाख रुपयापर्यंत करमुक्त इनकम टैक्स असावा व वार्षिक बेसिक इनकम टैक्स मर्यादा असावी अशी जनतेची मागनी अशी अनेक दिवसापासून होती परंतु ती पूर्ण झाली नाही तीन लाख मर्यादा अगोदर पासून सुरू आहे. त्यात काही बदल नाही GST धोरणात काही बदल नाही इनकम टॅक्सचे टप्पे किती वाढवले तरी गरीब मागास व मध्यमवर्गियांना त्याचा काडीचाही फायदा नाही. परदेशी कंपन्यांना गुंतवणूकीसाठी परदेस करात 34% वरून 25% टक्यावर आणून सुट दिली आहे. परंतु भारतीयांसाठी काहीही सुट नाही टूव्हीलर थ्री व्हीलर फोर व्हीलर वरील जीएसटी तेवढाच आहे त्यात फरक नाही. कर्जमाफीसाठी निधी नाही. मागासवर्गीय, अल्पसंख्याक, एससी, एसटी, ओबीसी, व्हीजे एन टी एसबीसी साठी स्कॉलरशिप मधे काहीही वाढ नाही गैस पेट्रोल डिझेल किमती आटोक्यात नाही बिजलीचे दर गगनाला व्याजासहित भिडले आहे गरीब व्यापारी अनेक टैक्स मुळे चिंतेने ग्रस्त आहे रेल्वे व बस किराया दररोज वाढत आहे म्हणून भाजपचे बजेट श्रीमंत उदोगपतीसाठी व्यापाऱयांसाठी कॉर्पोरेट बजेट आहे.