अन्नत्याग आंदोलन कर्त्या महिलांनी आमदार समीर कुणावार, माजी आमदार राजू तिमांडे व उपविभागीय अधिकारी यांच्या हस्ते निबूं-शरबत घेत उपोषण सोडले.
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- येथील विश्रामगृहामध्ये मेडिकल कॉलेज हिंगणघाटच्या शासकीय जागेबाबतच्या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी मेडिकल कॉलेज संघर्ष समिती तथा सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीला जिल्हाधिकारी, वर्धा यांनी चर्चेकरीता बोलावले असता आमदार कुणावार हे उपस्थित राहून जागेबाबत जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांच्याशी विस्तृत चर्चा केली असून यावेळी जिल्हधिकारी वर्धा यांनी माहिती दिल्यानुसार महाविद्यालयाच्या जागे संदर्भात एकुण तीन जागेचा प्रस्ताव पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला असून सदर तीनही जागा या शासकीय असणार असून लवकरच आयुर्विज्ञान दिल्ली येथील टिम येवून जागेची पाहणी करणार आहेत.
आमदार समीर कुणावार यांनी विधानसभा निवडणुक आचारसंहितेपूर्वी जागेचा प्रस्ताव सादर करत निधी मंजूर करून घेण्याची मागणी करीत तातडीने प्रस्ताव पाठविण्याबाबत निर्णय घ्यावा असे मत व्यक्त केले. त्याच बरोबर मागील दोन दिवसांपासून मेडिकल कॉलेज संघर्ष समितीच्या काही महिला भगिनीं यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते त्यांची भेट घेत व त्यांना बैठकीत झालेल्या मुद्दांची माहिती दिली त्यांनी बैठकीत ठरलेल्या निर्णयाचे स्वागत करत आमदार समीर कुणावार, माजी आमदार राजू तिमांडे व उपविभागीय अधिकारी यांच्या हस्ते निबूं-शरबत घेत उपोषण सोडले त्याचप्रमाणे वेळा संघर्ष समितीच्या मंडपाला भेट देत त्यांना सुध्दा त्यांचे सुरू असलेले धरणे आंदोलन थांबविण्याची विनंती केली असता माझ्या विनंतीला मान देत त्यांनी सुध्दा धरणे आंदोलनाची सांगतां केली.
येत्या काही दिवसांतच वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाटचा जागेचा तिढा सुटणार आहे यावेळी राहुल कर्डिले जिल्हाधिकारी वर्धा, आमदार समीर कुणावार, माजी आमदार राजू तिमांडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अतुल वांदिले, सतीश धोबे, संघर्ष समितीचे अध्यक्ष सुनील पिंपळकर, प्रविण उपासे, संदेश मुन, उपविभागीय अधिकारी, हिंगणघाट, तहसीलदार हिंगणघाट, पत्रकार बंधू आदी मान्यवर उपस्थित होते.