अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- गेल्या २३ वर्षापासुन जिल्हयातील वैद्यकीय अधिकारी ब गट संवर्ग पदोन्नतीच्या प्रतिक्षेत होते. याप्रकरणी राजपत्रित वैद्यकिय अधिकारी महासंघटनेच्या लढयामुळे शासनाने राज्यातील 710 वैद्यकिय अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीची यादी जानेवारी 2024 मध्ये प्रसिध्द केली. मात्र सहा महिने झाले तरी या यादीची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यात आली नसल्याने जिल्हयातील वैद्यकिय अधिकारी पदोन्नतीच्या प्रतिक्षेत आहेत.
वैद्यकिय अधिकारी ब गट हे शासकीय सेवेत येऊन 17 वर्षांचा कालावधी लोटला आहे. आजही त्यांना अतिरिक्त पदभाराचे काम करावे लागत आहे. प्रशासकिय बाबींचे कारण सांगुन याकडे दुर्लक्ष होत असल्याचे बोलले जात आहे.
वैद्यकिय अधिकारी ब गट सवर्गाच्या पदोन्नती संदर्भात आरोग्य विभागाने आतापर्यंत तीन स्मरणपत्रे दिली आहेत. मात्र शासनाकडुन कोणतीच हालचाल होत नाही. शासकिय अधिकाऱ्यांची अनेक वर्षे सेवा झाली आहे. शासनाकडुन पदोन्नतीची यादी प्रसिध्द होते मात्र त्याची अमंलबजावणी प्रशासकीय बाबींमध्ये अडकवली जाते. यावरुन अधिकारी, सचिव, मंत्री यांचे आरोग्य विभागावर नियंत्रण नाही हे स्पष्ट होते.
पदोन्नतीचा प्रश्न निकाली काढावा: कित्येक अधिकारी पात्र असुनही या लाभापासुन वंचित आहेत. राजपत्रित वैद्यकिय अधिकारी महासंघाने केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे जानेवारी 2024 मध्ये वैद्यकिय अधिकारी गट ब यांच्या पदोन्नतीस आवश्यक सेवाजेष्ठता यादी शासनाकडुन प्रसिध्द करण्यात आली होती. मात्र त्याची अमंलबजावणी अद्यापही झालेली नाही.
लोकप्रतिनिधी आणि संबधित अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे पदोन्नतीची अमंलबजावणी प्रशासकिय बाबींमध्ये अडकुन पडली आहे.
शासकीय नियमाप्रमाणे 10 वर्षांनंतर अधिकाऱ्यांची पदोन्नती करण्यात येते.
मात्र 22 वैद्यकीय अधिकारी गट ब हे 17 वर्षापासुन एकाच पदावर आणि तेही अतिरिक्त पदभार घेऊन काम करत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री आरोग्यमंत्र्यानी संघटनेच्या शिष्टमंडळ सोबत उच्चस्तरीय बैठक घेऊन वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा प्रश्न मार्गी लावावा. अशी मागणी महाराष्ट्र राज्य वैद्यकीय अधिकारी महासंघाचे सचिव डॉ. भागवत राऊत, डॉ. भुजाडे, डॉ. रजनी गजभिये, डॉ. रुईकर, डॉ. वाघमारे, डॉ. मनिषा लोंढे, डॉ. चौधरी, डॉ. पाटिल, डॉ. झरकर आदिनी केली आहे.
जिल्हा तांत्रिक सेवा आणि राज्यसेवा सवर्गांतील गट ब वैद्यकिय अधिकारी यांना ज्याप्रमाणे गट अ मध्ये पदोन्नती देण्यात आली. त्यांच नैसर्गिक न्याय तत्वानुसार २०१९ साली सेवासमावेशन झालेल्या वैद्यकिय अधिकारी गट ब यांना गट अ मध्ये पदोन्नती देण्याची प्रक्रिया लवकर करावी.
डॉ. प्रशांत वाडीभस्मे सचिव महाराष्ट्र राज्य वैद्यकीय अधिकारी महासंघ यांनी शासन जाणुनबुजुन प्रशासकीय बाबी पुढे करत वैद्यकिय अधिकाऱ्याकडे हे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला आहे. मुख्यमंत्री आरोग्यमंत्री यांनी याप्रकरणी लक्ष घालुन वैद्यकिय अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा करावा.
शासनाच्या विविध विभागांतील कर्मचाऱ्यांना ठरावीक सेवेनंतर विभागीय पदोन्नती देण्यात येते. परंतु आरोग्य विभागातील गट ब वैद्यकिय अधिकारी सवंर्ग कायमच पदोन्नती लाभापासुन उपेक्षित राहिला आहे. संघटनेकडून वारंवार मागणी करुन व नियमित पाठपुरावा करुनही पदोन्नती लाभ देण्यात आला नाही.

