मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट दि.२६ जुलै:- येथील भाजपा कार्यकर्ते रवींद्र रामजी लढी यांची भाजपाच्या”हिंगणघाट विधानसभा प्रमुख पदी” नियुक्ती करण्यात आली आहे. सदर नियुक्ती भाजपा जिल्हाध्यक्ष सुनील गफाट यांनी केली असून नुकतेच काल दि.२५ रोजी आमदार समिर कुणावार यांचे स्थानिक जनसंपर्क कार्यालयात हे नियुक्तीपत्र देण्यात आले.
याप्रसंगी आमदार समीर कुणावार, जिल्हा भाजपा उपाध्यक्ष किशोर दिघे, भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष अंकुश ठाकुर, भाजपा जिल्हा महामंत्री आकाश पोहाणे, हिंगणघाट विधानसभा प्रमुख संजय डेहणे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
रवींद्र रामजी लढी हे मागील सलग १२ वर्षेपर्यंत शिवसेनेच्या तालुका अध्यक्षपदी कार्यरत होते,तर त्यांच्या पत्नी सुशीला रवींद्र लढी या समुद्रपूर नगरपंचायत मध्ये काँग्रेस पक्षाकडून नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या. मागील नोव्हेंबर 2023 मध्ये त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला, त्या भाजपाच्या सक्रिय कार्यकर्त्या आहे.
सदर कार्यक्रमाला आमदार समीर कुणावार यांचेसह किशोर दिघे, अंकुश ठाकूर,आकाश पोहणे, संजय डेहणे यांचेसह समुद्रपुर भाजपा नगरसेवक ललित डगवार, नारायण बादले, संजय शेळके, नामदेव उमाटे, विलास भोंडे, प्रल्हाद नांदुरकर, रमेश मडावी, कमलेश भोयर, संजय चिडे, टिकाराम अमलनकर, धीरज मानकर, राजू कोल्हे, विलास मोटघरे, गिरीधर लढी इत्यादी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ता प्रामुख्याने उपस्थित होते.