मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व कृषिमंत्री यांच्याकडे मागणी.
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- मागील 7 दिवसापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नदी-नाले तुडुंब भरले असुन पुर येवुन शेतपिकांचे खुप मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. सरकारने सर्व्हे करून आर्थिक मदत देण्याबाबत माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषी मंत्री तसेच महसूल मंत्री यांना उपविभागीय अधिकारी मार्फत निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
वर्धा जिल्ह्यात मागील ०७ दिवसापासुन सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नदी-नाले तुडुंब भरले असुन पुर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतपीकांचे खुप मोठया प्रमाणात नुकसान झाले असुन पिके नेस्तनाभुत होवुन जळली आहे. त्याच प्रमाणे सर्व सामान्यांचे जनजिवन विस्कळीत झाले आहे.
वर्धा जिल्हयातील हिंगणघाट, समुद्रपुर, सेलु तालुक्यातील सिंदी रेल्वे, हमदापुर इत्यादी भागात रस्त्यावरील वाहतुक पुरामुळे काही वेळ बंद झाली होती. अनेक गावामध्ये घरामध्ये पाणी शिरले असून जनजिवन विस्कळीत झाले आहे. दोन दिवसाच्या ऑरेंज अलर्टमुळे पहिल्याच दिवसी जोरदार पाऊस येवून पुर परिस्थिती निर्माण झाली.
बोपापुर ते हायवे रोड पर्यंत ३५ लाख रूपयाचा निकृष्ठ दर्जाचा रोड व पुल बांधला असुन तो एक महिन्याच्या कालावधीत त्यावर खड्डे पडले आहे. त्यामुळे रहदारीस जनतेला खूप मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्या कामाची सर्वकष चौकशी करून अधिकारी व ठेकेदारावर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी केली आहे.
समुद्रपुर तालुक्यातील लाल नाला धरनाच्या परिसरात जोरदार पाऊस झाल्याने जलाशयाच्या पाणी पातळीत वाढ होवुन धरणाचे दरवाजे उघडण्यात आले होते. त्यामुळे कोरा, चिखली, मंगरूळ, खापरी, गिरगाव, दसोडा, ताडगाव, डोंगरगांव, नारायणपुर, आसोला, मेंढुंला, करूर, पाऊनगांव इत्यादी गावातील शेत पिके जलमय झाली होती. अशा प्रकारे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तरी सरकारने शेत पिकांचा सर्व्हे करून शेतकऱ्याना आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांच्या वतीने शासनाला करण्यात आली आहे.