अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील समुद्रपुर तालुक्यात येत असलेल्या गिरड परीसरात धुमाकूळ घातलेल्या वाघाने आपल मोर्चा पोथरा धरणाकडे वळविला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक दहशत पसरली.
गुरुवारी २५ जुलै रोजी सायंकाळी ८ वाजता या वाघाचे परडा शिवारात रमेश चंदनखेडे, सुरज ढगे यांच्या शेता जवळ गावातील काही युवकांना हा वाघ आढळून आला. यावेळी या वाघाच्या पायखुना सुध्दा नागरिकांनी बघितल्या आहेत. परिसरात वाघ दिसल्यामुळे नागरिकात मोठ्या प्रमाणात दहशत पसरली आहे.
परिसरात वाघाचा मुक्त संचार असल्यामुळे गावकऱ्यांनी सावधानी बाळगून जनावरांचे रक्षण करावे असे आवाहन वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

