संतोष मेश्राम राजुरा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा २७ जुलै:- बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळ राजुरा द्वारा संचालित आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर राजुरा येथे राष्ट्रीय शिक्षण धोरण च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त दि.२२ जुलै ते २८ जुलै या कालावधीत शिक्षण सप्ताह साजरा करण्यात आला. या आठवड्यात प्रत्येक दिवस एका विशिष्ट उपक्रमासाठी नियोजित करण्यात आले होता. यामध्ये शिक्षण व विकासाच्या विविध पैलूंचा समावेश आहे हा शिक्षण सप्ताह विद्यार्थी, शिक्षक, धोरणकर्ते व भागधारक यांच्यामध्ये सहकार्य वाढविनारा ठरला आहे.
यावेळी अध्ययन अध्यापन साहित्य दिवस, मूलभूत संख्याद्यान व साक्षरता दिवस, क्रीडा दिवस, सांस्कृतिक दिवस, कौशल्य व डिजिटल उपक्रम दिवस, मिशन लाईफच्या दृष्टीक्षेपात इको क्लब उपक्रम, शालेय पोषण दिवस, समुदाय सहभाग दिवस असे विविध उपक्रम आठवडाभरात राबविण्यात आले. मातीपासून विविध वस्तू निर्मिती, कागद, बांबूच्या काड्या पासून खेडणी तयार करणे व कापडी पिशव्या निर्मिती, नृत्य, नाट्य, दूरदर्शन च्या साह्याने माहिती दाखविणे, एक पेंड माँ के नाम, शालेय परीपाठा दरम्यान निपुण प्रतिज्ञा घेण्यात आली, गणितीय आकार संख्याज्ञान वर आधारित रांगोळी स्पर्धा, शासना कडून उपलब्ध झालेल्या पीएसई किट जादुई पिटारा यामधील साहित्याच्या माध्यमातून लेखनपूर्व व गणनपूर्व कृती करून घेण्यात आल्या, देशी खेळांना प्रोत्साहन मिळावे याकरिता वेगवेगळे खेळ घेण्यात आले.
या उपक्रम अंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी संवेदनशीलता विकसित करणे, सद्यस्थितीतील पर्यावरणीय समस्या जाणून घेणे, सकारात्मक दृष्टिकोन, अभिवृत्ती विकसित करणे या उद्देशाने शैक्षणिक कृतींचे आयोजन करण्यात आले. आरोग्यदायी जीवनशैली स्वीकारणे, ऊर्जा बचत करणे, शाश्वत अन्न प्रक्रिया स्वीकारणे आदींवर प्रत्यक्ष कृती व मार्गदर्शन, चर्चासत्रे आयोजित करण्यात आली.
आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर राजुरा शाळेच्या मुख्याध्यापिका नलिनी पिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली , बादल बेले, राष्ट्रीय हरित सेना विभाग प्रमुख तथा स्काऊट लीडर यांच्या नेतृत्वाखाली सर्व उपक्रम राबविण्यात आले. यावेळी शिक्षिका ज्योती कल्लूरवार, रोशनी कांबळे, वैशाली टिपले, जयश्री धोटे, रुपेश चिडे, सुनीता कोरडे, अर्चना मारोटकर, वैशाली चिमुरकर, मनीषा खामनकर, पूजा बावणे, रणदिवे आदीं शिक्षकांचे सहकार्य लाभले.
या उपक्रमांच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय हरित सेना इको क्लब, स्काऊट गाईड, शाळा व्यस्थापन समितीचे पदाधिकारी, माता पालक संघ, शालेय परिवहन समिती, शालेय मंत्रिमंडळ, पालकांचे सहकार्य लाभले. यावेळी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत अथक परिश्रम घेतले. सुरेश येलकेवाड, वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रादे.) वनविभाग राजुरा, इंगळे, वनपरिक्षेत्र अधिकारी, सामाजिक वनीकरण परिक्षेत्र राजुरा, मनोज गौरकार, गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती राजुरा, राहुल अवधूत, शाखा व्यवस्थापक सन्मित्र महिला बँक शाखा राजुरा, डॉ. डुकरे यांचे यावेळी मार्गदर्शन लाभले.