पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपुर
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका घरमालक आणि त्यांच्या पत्नीत सुरू असलेल्या वादात पडणे एका व्यक्तीला महागात पडले की त्याला आपला जीव गमवावा लागला. एका घरमालकाने रागाच्या भरात येऊन भाड्याने राहणाऱ्या तरुणाची निर्घृण हत्या केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी घरमालकाला अटक केली आहे. पंकज सोलंकी असे या मयत व्यक्तीचे नाव आहे. हा केम्प्टी परिसरात आरोपी महेश उके यांच्या घरात भाडे स्वरूपात राहत होता.
हत्या करण्यात आलेला पंकज सोलंकी शुक्रवारी रात्री ऑफिस मधून आपल्या कीरायाच्या खोलीत आला तेव्हा त्याने घरमालक आणि त्याच्या पत्नी मध्ये जोरदार वादावादी झाली सुरू असल्याचे पाहले. त्यानंतर पंकज ने या दोघा पती पत्नी मध्ये मध्यस्थी करून त्यांच्यातील वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. या गोष्टीचा घरमालकाला मोठा राग आला आणि त्याने रागाच्या भरात येऊन त्याच्या गळ्यावर चाकूने सपासप वार केले. त्यात तो गंभीररित्या जखमी झाला.
त्याला तातडीने जखमी अवस्थेत रुग्णालयात नेले असता तपासणीअंती त्याला डॉक्टरने मृत घोषित केले. त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी या हत्येप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करून घरमालकाला बेड्या ठोकल्या आहे.