Thursday, March 5, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home देश विदेश

हिंगणघाट नगर पालिकेच्या ठेकेदाराचे फुटपाथ वरील गरीब व्यवसायिकाकडून अवैध वसुली प्रकरण, 20 दिवस होऊनही कारवाई नाही. पाणी कुठ मुरत?

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
September 20, 2022
in देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
हिंगणघाट नगर पालिकेच्या ठेकेदाराचे फुटपाथ वरील गरीब व्यवसायिकाकडून अवैध वसुली प्रकरण, 20 दिवस होऊनही कारवाई नाही. पाणी कुठ मुरत?
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

∆ अवैध वसुलीचे पावतीचे ऑडिट करण्यात यावे.
∆ या ठेकेदारावर कधी होणार कारवाई.
∆ नगर पालिका प्रशासन हे अवैध ठेकेदाराचे वसुली प्रकरण दाबणारतर नाही?

✒️मुकेश चौधरी, कार्यकारी संपादक

हिंगणघाट:- ज्या नगर पालिका म्हणजेच स्थानिक स्वराज्य संस्थांचे काम आहे शहरातील नागरिकांना मूलभूत सुविधा आणि रोजगाराच्या संधी निर्माण करून देणं पण त्याच नगर पालिकेच्या आशीर्वादाने शहरातील फुटपाथ वरील गरीब छोट्या व्यावसायिका कडून अवैध रित्या वसुली करण्यात येत असल्याची बातमी महाराष्ट्र संदेश न्युजने प्रकाशित केली होती. 20 दिवस उलटून ही नगरपालिका प्रशासनाने या फुटपाथ वरील गरीब व्यावसायिकाची लूट करणाऱ्या ठेकेदारावर कुठलीही कारवाई केली नाही.

14 डिसेंबर 2020 ला हिंगणघाट नगर पालिकेच्या सर्व साधारण सभेत शहरातील फुटपाथ वरील व्यावसायिक कर वसुलीचा ठेका एका व्यक्तीला देण्यात आला. त्यावेळी घेण्यात आलेल्या ठरावात कोणत्या व्यावसायिकांकडून किती कर घायचा हे नगर पालिकेने ठरवून दिले होते. पण नगर पालिका प्रशासनाने ठरवून दिलेल्या अटी आणि नियम या ठेकेदाराने पायाखाली तुडवत नियमाच्या बाहेर जाऊन फुटपाथ वरील गरीब छोट्या व्यावसायिकाची लूट सुरू केली.

शनिवार दि. 27 ऑगस्ट ला हिंगणघाट येथील कारंजा चौक येथे आयोजित करण्यात आलेल्या तान्हा नंदी पोळात शहरातील फुटपाथ वरील व्यावसायिकानी खीलोने, फुगे आणि छोटे छोटे अनेक दुकाने लावली होती. त्यावेळी हिंगणघाट नगर पालिका तर्फे कर वसुलीचा ठेका दिलेल्या ठेकेदाराने अवैध प्रमाणात आपले उखळ पांढरे करून वसुली केली. काही लोकांनी विरोध केला तर दुकान फेकून देऊ अशी भाषा वापरण्यात आली. त्यामुळे या ठेकेदारा विरुध्द आणि नगर पालिका प्रशासनावर या फुटपाथ वरून छोट्या व्यवसायिकांनी संताप व्यक्त केला.

या वेळी छोट्या व्यावसायिका कडून या ठेकेदाराने 15 रुपयाच्या ऐवजी 30 आणि 50 रुपये घेतले. आणि हिंगणघाट नगर पालिका आणि ठेकेदार यामध्ये झालेला करार व नगर पालिकेच्या झालेल्या सर्व साधारण सभेत झालेल्या ठरावाला पायाखाली तुडवत नियमाच्या बाहेर जाऊन वसुली केली.

नगर पालिका हिंगणघाट यांच्या नावाने पावती बुक बनवून त्यात नगर पालिकेच्या शिक्का नाही किंव्हा पावतीवर पावती क्रमांक न छापता अवैध रित्या पावती देऊन गोर गरीब फुटपाथ वरील छोट्या छोट्या दुकान दाराची मागील अनेक वर्षापासून साखरकर नावाचा ठेकेदार लूट करत आहे. 14 डिसेंबर 2020 ला नगर पालिका हिंगणघाट येथे सर्व साधारण सभेत घेतलेल्या ठरावात कुठेही 30 रूपये घेण्याचे ठरले नसताना साखरकर या ठेकेदाराने नगर पालिकेच्या नावाने 30 रुपयाच्या अवैध पावती तयार केली आणि नगर पालिकेच्या ठरावाला पायाखाली तुडवत महिन्याकाठी लोखो रुपयाची अवैध वसुली करत आहे.

अवैध वसूली… कारवाई कधी?

ज्या वेळी महाराष्ट्र संदेश न्युजने हे प्रकरण उजागर केलं आणि हिंगणघाट नगर पालिका प्रशासनाच्या निदेर्शनास आणून दिलं. त्यांनी या अवैध वसुलीबाज ठेकेदार साखरकर यावर कुठलीही कारवाई केली नाही. आम्ही त्याला पत्र देऊ त्याला कार्यालयात बोलवू अशीच यावेळी उत्तरे दिली. आज पर्यंत या ठेकेदारावर काहीही कारवाई केली नाही. त्यामुळे पाणी कुठे मुरत तर नाही ना असे प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.

किती वसुली केली याचे ऑडिट व्हावे..

नगर पालकेतील आम सभेत मंजूर ठरावात 30 रूपये घेण्याचे कुठेच उल्लेख नसताना साखरकर याने नगर पालिकेच्या नावाने बनावटी पावती बुक बनवून त्यावर नगर पालिकेच्या शिक्का किंव्हा पावती क्रमांक न छापता वसुली सुरू केली. महिन्याला लाखो रुपयांची ही वसुली सुरू आहे. त्यामुळे शहरातील फुटपाथ वरील गरीब व्यावसायिकाची मोठ्या प्रमाणात लूट झाली. त्यामुळे या सर्व अवैध पावट्याचे ऑडिट करून त्याच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी हिंगणघाट शहरात व्यावसायिक करत आहे.

जेव्हा स्थानिक नगर पालिका प्रशासनाच्या आशीर्वादानेच स्थानिक गरीब फुटपाथ वरील व्यावसायिकाची लूट करण्यात येत असेल तर दाद मागायची कुणाला असे उदगार गरीब व्यावसायिकांनी महाराष्ट्र संदेश न्युज जवळ व्यक्त केले आहे.

आता नगर पालिका प्रशासन या अवैध वसुली करणाऱ्या ठेकेदारावर काय कारवाई करते याकडे शहरातील फुटपाथ दुकानदाराचे लक्ष लागले आहे.

Previous Post

हिंगणघाट नगर पालिकेच्या ठेकेदाराचे फुटपाथ वरील गरीब व्यवसायिकाकडून अवैध वसुली प्रकरण, 20 दिवस होऊनही कारवाई नाही. पाणी कुठ मुरत?

Next Post

शिक्षा भोगलेल्या सराईत तडीपार रेकॉर्ड वरील गुन्हेगाराचा पाठलाग करुन त्याच्याकडून दोन पिस्टल , तीन गावठीकट्टे व ३ राऊंड असा एकुण १,४१,००० मुददेमाल माल जप्त करुन.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
घरफोडी करणा-या गुन्हयातील आरोपीस ०२ वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा.

शिक्षा भोगलेल्या सराईत तडीपार रेकॉर्ड वरील गुन्हेगाराचा पाठलाग करुन त्याच्याकडून दोन पिस्टल , तीन गावठीकट्टे व ३ राऊंड असा एकुण १,४१,००० मुददेमाल माल जप्त करुन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In