संतोष मेश्राम, राजुरा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- श्रीगुरुदेव सेवा मंडळ रामपूरचे माजी अध्यक्ष आमचे प्रेरणास्थान स्व. महादेव उरकुंडे यांचा श्रद्धांजली कार्यक्रम हनुमान मंदीर रामपुर इथे आयोजित करण्यात आला. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या कार्य व विचाराचा प्रचार प्रसार व्हावा जनमानसात जनजागृती व्हावी हा उद्देश समोर ठेवून तसेच निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण करून स्वर्गीय महादेव उरकुंडे यांच्या परिवारातील गुरुदेव सेवा मंडळाचे सक्रिय प्रचारक व सेवामंडळ रामपूरचे सचिव, त्यांचे पुत्र प्रकाश उरकुंडे व त्यांचे कुटुंब यांनी ध्यान प्रार्थना, ग्रामस्वछता, ग्रामगीता वाचन,भजन, कीर्तन, श्रद्धांजलीपर मार्गदर्शन, सामुदायिक प्रार्थना व आप्तेष्ट यांना ग्रंथ वाटप असे विविध कार्यक्रमाचे आयोजन करून समाजात आदर्श निर्माण केला आहे.
या कार्यक्रमाला ह.भ.प रोकडे महाराज, ह.भ.प गौरकार महाराज, ह.भ.प बोरकुटे महाराज, ह.भ.प बुटले महाराज, ह.भ.प साळवे महाराज, ह.भ.प कावळे महाराज, ग्रामगीताचार्य मारोती सातपुते, ग्रामगीताचार्य विद्या जुनघरी, ग्रामगीता जीवन विकास परीक्षा तालुका प्रमुख मोहनदास मेश्राम, गणेश खाडे, अनिल चौधरी, देव वांढरे व अनेक गुरूदेव उपासकांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे आयोजन विमलबाई महादेव उरकुंडे, शंकर उरकुंडे, प्रकाश उरकुंडे, त्यांचा संपूर्ण परिवार तथा आप्तेष्ट, गुरुदेव सेवा मंडळाचे सर्व कार्यकर्ते यांनी केले व राष्ट्रवंदना घेऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.