मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिगंणघाट:- येथील भारत माध्यमिक व उच्च माध्यमिक विघालयात शैक्षणिक सत्र 2024-25 करिता शालेय मंत्री मंडळ व स्वच्छाता समितीचे गठन करण्यात आली. त्यात शालेय मंत्री मंडळात महानायक म्हणुन साहिल विनोद अवचट वर्ग 10 वा, उपनायका श्रृती गजानन बाळबुधे 11 वा, उत्सवनायक अनिषा किसना डाखोरे वर्ग 10 वा, उपउत्सवनायक मयुर गजानन गेडाम वर्ग 9 वा, क्रिडामंत्री भाविक रामदास हरडे वर्ग 10 वा, उपक्रिडामंत्री कु. करिाष्मा देवानंद बनसोड वर्ग 9 वा, आरोग्यमंत्री व स्वच्छता मंत्री तन्वी धनराज डंभारे वर्ग 10 वा, उपआरोग्यमंत्री व स्वच्छता मंत्री नेहल अरूण पोहाणे वर्ग 8 वा, पर्यावरणमंत्री धृप सुधाकर येनोरकर वर्ग 12 वा, उपपर्यावरणमंत्री दिशांत गजानन बोरकर वर्ग 8 यांची निवड करण्यात आली.
यावेळी ही निवडणूक प्रक्रिया क्रीडा शिक्षक विनोद कोसुरकर, संदिप चांभारे, कु.सजंना चौधरी यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आली. या नियुक्ती करिता प्रोग्रेसिव्ह अेज्युकेशन संस्थचे अध्यक्ष गोकुलदास राठी, सचिव रमेश धारकर, उपाध्यक्ष श्याम भिमणवार, संस्थचे सर्व संचालक सदस्य, मुख्याध्यापक राजूजी कारवटकर, उपमुख्याध्यापक हरीश भट्टड, पर्यवेक्षिका निलांक्षी बुरीले विनोद नांदुरकर यानी अभिनंदन केले.