आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- मागील काही दिवसांपासून हिंगणघाट तालुक्यात सतत मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील अनेक रस्त्ये पुल मोठ्या प्रमाणात शतिग्रस्त झाले आहे. त्यात फुकटा या गावाला जोडणारा पूल पूर्णपणे तुटला आहे. या गावातल्या ४०० पेक्षा जास्त शेतकऱ्यांची शेती पुलाच्या पलीकडे आहे. हा पूल तुटल्याने फुकटा या गावातील शेतकऱ्यांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, काल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते अतुल वांदीले यांनी गावात भेट दिली व स्थानिक शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेतल्या आणि त्या शासन दरबारी मांडण्याचे आश्वासन दिले. शेतकरी, कष्टकरी जनतेच्या कायम मी सोबत असेल असा त्यांना विश्वास दिला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ओबीसी जिल्हाध्यक्ष प्रशांत घवघवे, जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे,बूथ अध्यक्ष लंकेश्वर वरघने, गणेश ढगे, सुशील वरुडकर, संदीप पाटील, बालु बोरकर, आशिष चतुरकर, मुकुंदा वरघने, नयन वरघणे, संजू तिजारी, बाबाराव कारवटकर, नितीन नक्षीने, विजय वरघणे, राजू देवतळे, धनराज वरघणे, गोपाल येरकांडे, बालू वरघणे, नरेश देवतळे तसेच गावातील स्थानिक नागरिक व शेतकरी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.