मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सिरोंचा:- तालुक्यातील मेडाराम ग्रामपंचायत अंतर्गत तीगालगुडम गावामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम शिवसेना तालुकाप्रमुख रघुजी जाडी यांच्या नेतृत्वात घेण्यात आले.
यावेळी शिवसेना सचिव विनायक राऊत, पूर्व विदर्भ संपर्क नेते तथा आमदार भास्कर जाधव, पूर्व विदर्भ समन्वयक प्रकाश वाघ, गडचिरोली जिल्हा संपर्कप्रमुख महेश केदारी यांच्या मार्गदर्शनाखाली, शिवसेना जिल्हाप्रमुख अहेरी रियाज भाई शेख यांच्या सहकार्याने, तसेच शिवसेनेचे झुंजार तडफदार युवा नेतृत्व रघुजी जाडी यांच्या नेतृत्वात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस अतिशय उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला.
उद्धव ठाकरे यांचा वाढदिवसानिमित्त सिरोंचा तालुक्यातील मेडाराम ग्रामपंचायत अंतर्गत तीगालगुडाम गावामध्ये आदिवासी बंधू-भगिनींना शेतामध्ये काम करताना पावसापासून संरक्षण करण्याकरिता प्लास्टिक रेनकोट वाटप करण्यात आले. जेणेकरून शेतामध्ये काम करत असताना त्यांना पावसापासून संरक्षण करण्यात येईल आणि शेतीचे कामे व्यवस्थित पूर्ण होतील. गावातील लहान मुलांना बिस्किट वाटप करण्यात आले.
याप्रसंगी नारायणपूरचे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माजी उपसरपंच केशव नसकुरी, प्रशांत नसकुरी, मोरे येलया रुपेश नुकूम राज शेखर भिमकारे व्यंकटेश इंगली तसेच आदी सर्व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

