अती पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पानी उभे पीक डोळ्यासमोर झालीं नष्ट. ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देत शेतकऱ्यांच्या डोळ्याचे पानी पुसणाचे केलें शासनाला आवाहन. तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन त्यांना आर्थिक मदत तात्काळ द्यावी. पावसामुळे हिंगणघाट-समुद्रपूर तालुक्यातील खचलेले व वाहून गेलेले रस्ते व नाल्यांची तातडीने दुरुस्ती करण्याचे आदेश द्यावे. सततच्या होणाऱ्या पावसामुळे अनेकांच्या घरांचे नुकसान झाले अशा कुटूंबांना शासनाने तात्काळ मदत द्यावी. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांचे तहसीलदार मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन.
आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- हिंगणघाट – समुद्रपूर तालुक्यात मागील पंधरा दिवसांपासुन सुरु असलेल्या सततधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठें नुकसान झाले आहे. अती पावसामुळे शेतातील उभे पिके जळाली आहे .. शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी असून, ताबडतोब ओला दुष्काळ जाहीर करत शेतकऱ्यांना कर्जमाफी करून आर्थिक मदत करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
सततच्या पावसाने सर्वत्र जनजीवन विस्कळित झाले आहे. सगळीकडे पावसाचा हाहाकार उडाला आहे. मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील कपाशी, सोयाबीन, तूर व इतर पिकांची वाढ थांबली, पीक पिवळे पडले, अतिवृष्टीमुळे भागातील शेतजमीन आणि पिकेही खरडून गेली नदी-नाल्या काठावरील शेतातील पीक पाण्याखाली आले, वाहून गेले. शेतीसाठी घेतलेले कर्ज परतफेड कशी करावी, कुटूंबाचा उदरनिर्वाह, मुलांचे शिक्षण असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांसमोर आवासून उभे ठाकले आहेत. अतिवृष्टीने शेतात काम करुन जगणाऱ्या शेतमजुरांची मजुरीही बंद असल्याने त्यांच्यापुढेही प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच वन्यप्राण्यामुळे सुद्धा शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकऱ्याचे व शेतमजुराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असल्याने ओला दुष्काळ घोषित करण्यासह शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यात यावे. अस्मानी संकट व वन्याप्राण्यां कडून व सततधार पावसामुळे होणाऱ्या पिकांच्या नासाडीमुळे शेतकरी हा हवालदिल झाला आहे. शासन व प्रशासनाने अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करावे व त्यांना तात्काळ आर्थिक मदत जाहीर करुन शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात यावी.
हिंगणघाट-समुद्रपूर तालुक्यात ठिकठिकाणी गेल्या पंधरा दिवसांपासून सततधार पावसामुळे नदी-नाले हे पातळीपेक्षा जास्त प्रमाणात वाहत असल्याने नाल्यावरील पुलांचे व रस्त्यांची अवस्था दयनीय झालेली आहे. जागोजागी खड्डे पडलेले असून त्या रस्त्यांवरुन वाहनांना जाण्या-येण्यास नाहक त्रास सहन करावा लागत आहे व रस्त्यावरील खड्डे हे अपघातास निमंत्रण देत आहे. तर काही ठिकाणी पावसामुळे पुल वाहून गेल्याने जनसंपर्क तुटलेला दुरुस्ती करण्याचे आदेश देण्यात यावे. असून नादुरुस्त रस्त्याचा व पुलाची तात्काळ तसेच काही ठिकाणी सततच्या होणाऱ्या पावसामुळे अनेकांच्या घरांचे नुकसान झाले असून काहींच्या घरांचे छप्पर सुद्धा उडालेले आहे. अशा कुटूंबांना तात्काळ पंचनामे करुन त्यांना आर्थिक मदत देण्यात यावी. करिता आपण या सर्व बाबींचे गांर्भिय लक्षात घेवून तात्काळ उपाययोजना करण्यात यावी हि मागणी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी केली आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष सुनिल राऊत, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले, तालुका अध्यक्ष महेश झोटिंग पाटील, वासुदेव गौळकार, शहराध्यक्ष बालु वानखेडे, अल्पसंख्याक प्रदेश सचिव मोहम्मद अजानी, ओबीसी जिल्हाध्यक्ष प्रशांत घवघवे, वाहतूक जिल्हाध्यक्ष शेखर जाधव, अपंग जिल्हाध्यक्ष मारोती महाकाळकर, जिल्हा उपाध्यक्ष राजेश धोटे, जिल्हा प्रचार प्रमुख संतोष तिमांडे, युवक प्रदेश सचिव प्रशांत लोणकर,जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, जिल्हा सरचिटणीस सुभाष चौधरी, अमोल बोरकर, माजी नगरसेवक बालाजी गहलोत, हि. युवक तालुका अध्यक्ष राहुल वानखेडे, सुनील भुते, स.युवक तालुका अध्यक्ष तुषार थुटे, अल्पसंख्याक विधानसभा अध्यक्ष जावेद मिर्झा, महिला शहर कार्याध्यक्ष सिमा तिवारी, सुजता जांभुळकर, सुनिता तांमगाडगे, अजय पर्बत, पुरुषोत्तम कांबळे, संजय लोणकर, अहमद खान पठाण, प्रवीण कलोडे,चोखराम डफ, अनिल लांबट, नदीम भाई, नितीन भुते, हेमंत घोडे, कुणाल येसबंरे, बबलू शेख,देवा शेंडे, रंजित भोमले अमोल मेंढुले, प्रशांत एकोणकर, परम बावणे, सोहम शेंडे, आशिष शेंडे, बच्चू कलोडे, सुशील घोडे, शेखर ठाकरे, नदीम अली, पंकज मानकर, मोहम्मद शाहिद, पंकज भट्ट, विपील वाढई, आकाश हुरले, अभय सावरकर, आदेश तडस यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.