अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाट बद्दल अनेक दिवसापासून आंदोलनात्मक पवीत्रा घेऊन आंदोलन कर्त्यानी शेवटी आमदार समीर कुणावर यांना उपजिल्हा रुग्णालयाच्या मागील जागेचा प्रस्ताव पाठवण्यास प्रवृत्त केले. त्याचबरोबर जिल्हाधिकारी यांनी रेस्ट हाऊस बैठकीत व उपविभागिय अधिकारी शिल्पा सोनाली ह्यांनी आंदोलन स्थळी जाहीर केल्यानुसार हिंगणघाट, गव्हा कोल्ही व नांदगाव याप्रकारे ए बी व सी विकल्प असणार आहेत. आणि त्या जागेवर असलेले रिझर्वेशन लगेच काढण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे असा निर्णय घेण्यात आला आहे.
हिंगणघाटच्या जागेला प्रथम प्राधान्य देऊन येथे जागा उपलब्ध नाही या कारणासाठी ते कॉलेज दुसरीकडे जाऊ नये म्हणून पाच किलोमीटरच्या आत दोन आणि तीन असे पर्यायी विकल्प देण्यात येणार आहेत. तर हे सर्व होत असताना हिंगणघाट च्या काही संधीसाधू लोकांनी त्यांची जमीन ज्या ठिकाणी आहे त्या जागेचा प्रस्ताव मांडला आहे. जिल्हाधिकारी यांच्या समोर नांदगाव गावाचा उल्लेख, स्थळ निश्चितीसाठी केला केला होता. पण नांदगाव हे ठिकाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय साठी पूर्णपणे असुवीधाजनक आहे. कारण नांदगाव येथे प्रस्तावित जागे लगत उजव्या बाजुला हिंगणघाट नगरपालिकेचा घनकचरा व्यवस्थापनाचा डाव्या बाजूला मोठा डेपो आहे. त्याच प्रकारे उजव्या बाजूला वेगवेगळ्या कॉटन इंडस्ट्रीज (कॉटन प्रदुषित), ऑइल इंडस्ट्रीज आहेत. त्यामुळे हया एमआयडीसी कारखानाग्रस्त प्रदुषित भाग असल्यामुळे ग्रीन झोन हॉस्पिटल साठी पूर्णपणे सोयीस्कर असा भाग समजला जाऊ शकत नाही. हे हिंगणघाट मधील काही लोकांची जमिनी इथे असल्यामुळे आणि ते रेस्ट हाऊस येथील बठकीत सहभागी होऊन त्यांनी नांदगाव या जागेचा आग्रह वयक्तिक स्वार्थासाठी धरलेला दिसतो. परंतु हिंगणघाट च्या जनतेनी सर्वप्रथम हिंगणघाट हे विकल्प सर्वोत्कृष्ट असल्याचे मत मांडले आहे.
त्यानंतर गव्हा (कोल्ही) पुढील दृष्टीकोणातून आणि विधानसभेतील तिन्ही क्षेत्रांना म्हणजे सिंधी, समुद्रपुर हिंगणघाट येथे वैद्यकीय सुविधेत न्याय मिळणारे स्थळ आहे, असे बोलले जात आहे. त्याचबरोबर हिंगणघाट आणि जाम हे दोन्ही भविष्यात एकत्र शहर होऊन नागपूर या शहराला मेट्रोने जोडले जाऊ शकते. त्यामुळे कलेक्टर साहेब आणि तहसीलदार लोकांनी म्हटल्याप्रमाणे ए हिंगणघाट बी गावा कडली आणि सी नांदगाव याच ठिकाणाला प्राधान्य देण्यात यावे आणि त्याच प्रकारे प्रस्ताव पाठवण्यात यावेत अशी जन सामान्या ची चर्चा आहे.
तांत्रिकदृष्ट्या विचार केल्यास तर सर्व पक्षिय आणि जनता अशा सामूहिक सभेत चर्चा झाल्या नुसार ब्राऊन आणि ग्रीन झोन अशा दोन प्रकारचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रकल्पाला मंजुरी असते. ग्रीन झोन म्हणजे 400 बेड सह पूर्णपणे मोठा प्रोजेक्ट त्यामध्ये हॉस्पिटल आणि कॉलेज एकत्र असणार अशी ती संकल्पना आहे.
ब्राऊन झोन प्रकल्पा मध्ये ज्या ठिकाणी अगोदरच रुग्णालय आहे तिथेच अतिरिक्त जागेत कॉलेज उभारले जाते. त्यापैकी हिंगणघाट साठी ग्रीन झोन म्हणजे मोठा प्रोजेक्ट मंजूर झालेला आहे असे कलेक्टर राहिले कर्डिले साहेबां नी सभेत कळवले. त्यासाठी हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयाच्या मागची जागा ही सविस्तर नसून त्यामध्ये थोडे अडथले येऊ शकत ता हे त्यांनी स्पष्ट केले होते. त्यांच्या म्हणण्यानुसार ग्रीन झोन प्रोजेक्ट साठी गव्हा (कोल्ही )हा एक सर्वोत्कृष्ट स्थळ आहे. त्यामुळे ग्रीन झोनसाठी एमआयडीसी (कारख्यान्या) जवळ आणि घन कचरा व्यवस्थापन डेपो जवळ हॉस्पिटल होणे हे एवढे सोयीचे नक्कीच नाही. तीन विकल्पा मध्ये ए,बी व सी पैकी हिंगणघाट हे स्थळ ब्राऊन झोन साठी तर गव्हा कोली हे स्थळ ग्रीन झोन या प्रकल्पासाठी सर्वोत्कृष्ट आढळते असे तज्ञांचे मत आहे.