पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपुर
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- संपूर्ण देशभरात ओबीसी विद्यार्थ्यांसाठी एकही स्वतंत्र वस्तीगृह नाही. ओबीसी संघटनेच्या सततच्या रेट्यामुळे शासनाने 72 वस्तीगृह मंजूर केलेत. मागील सात वर्षापासून शासन फक्त घोषणा करत आहे. ओबीसी विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र वस्तीगृह सुरू करू.परंतु आज पर्यंत शासनाने एकही वस्तीगृह सुरू केलेला नाही. मागील सत्रात इमारत नाही म्हणून वस्तीगृह सुरू केले नाही. या सत्रात इमारती आहेत तर फर्निचर नाही म्हणून वस्तीगृह सुरू होत नाहीत.
ओबीसी मंत्र्यांनी 15 ऑगस्ट 2023 रोजी वस्तीगृह सुरू करू असे पावसाळी अधिवेशनात सांगितले होते. परंतु आज एक ऑगस्ट 2024 पर्यंत शासनाने एकही वस्तीगृह सुरू केलेला नाही. गरीब ग्रामीण मागासवर्गीय ओबीसी विद्यार्थी शासनाच्या या लेटलतीपणाला कंटाळलेला आहे. विद्यार्थ्यांना आर्थिक मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. ओबीसी विद्यार्थी वस्तीगृहाअभावी भाड्याच्या खोलीत वास्तव्य करत आहेत.
ओबीसी युवा अधिकार मंच च्या मार्फत विद्यार्थ्यांच्या वतीने शासनाला कळवले गेले होते की जर 31 जुलै 2024 पर्यंत शासनाने वस्तीगृह सुरू केले नाहीत तर एक ऑगस्ट 2024 रोजी विद्यार्थी स्वतः वस्तीगृहाचा ताबा घेतील. म्हणून आज सकाळी ठीक 11.30 वाजता सर्व विद्यार्थी ओबीसी विद्यार्थ्यांचे वस्तीगृह बहादूर पांडव कॉलेजच्या जवळ येणार आहेत आणि विद्यार्थी वस्तीगृहाचा ताबा घेणार आहेत. तेव्हा सर्वांची उपस्थित राहावे असे आवाहन उमेश कोर्राम मुख्य संयोजक, ओबीसी युवा अधिकार मंच यांनी दिली आहे.