श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- जिल्हाचे पालकमंत्री तथा राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या नाथरा या गावी आर्थिक व्यवहारातून गोळीबार झाल्याची घटना घडली होती त्यामुळे संपूर्ण जिल्हात एकच खळबळउडाली आहे. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे मात्र या गोळीबार प्रकरणातील आरोपी फरार झाल्याची माहिती समोर येत आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहे. पालकमंत्री तथा राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचा गावात ही घटना घडल्याने कायदा, सुव्यवस्था ढासळलीय का अशा प्रश्न केला जात आहे.
नाथरा येथील महादेव मुंडे आणि प्रकाश मुंडे यांच्यात आर्थिक व्यवहारातून गेल्या अनेक दिवसापासून वाद सुरु होते. शनिवारी दुपारच्या सुमारास प्रकाश मुंडे यांनी गावठी पिस्तूल मधून हवेत गोळीबार केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पोलीस निरीक्षक मनिष पाटील पुढील तपास करत आहेत.

