मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- आचार्य बाळकृष्णजी महाराज यांनी औषधी वनस्पतींचे विश्लेषण करून आणि रोगांवर उपचार करून संपूर्ण भारतात वनौषधींचे महत्त्व पटवून दिले आहेत. आपल्या आयुर्वेदाला आपण विसरलो परंतु बाळकृष्ण महाराजांनी त्याला घरात पोहचले जडीबुटी ची माहिती तळागाळापर्यंत पोहोचवली आहे व्यस्त जिवन शैलीमुळे आपल्या आरोग्याला अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागते या समस्या वर उपाय म्हणजे सहजपणे उपलब्ध असलेल्या जडीबुटीची ओळख व त्यांचे फायदे भावीपिढिनी तज्ञांकडून समजावून घेऊन जडीबुटी चा वापर केला पाहिजे तसेच बेल, आवळा, बिहाडा, निंब, अडूळसा, गुळवेल, कोरफळ सारखे औषधी गुणधर्म वृक्ष लागवड संगोपन करण्यासाठी प्रत्येकांनी पुढाकार घ्यावा असे मत वसंतराव पाल यांनी व्यक्त केले.
पतंजली योग समिती, भारत स्वाभिमान, किसान सेवा समिती, युवा भारत हिंगणघाट वतीने बसस्थानक चौक येथे रविवारी सकाळी आचार्य बाळकृष्ण महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त जडीबुटी दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक वसंतराव पाल गुरुजी
जिल्हा प्रभारी भारत स्वाभिमान ट्रस्ट वर्धा जिल्हा, प्रमुख पाहुणे माजी नगराध्यक्ष प्रेम बसंतानी, माजी नगरसेविका शुभांगी डोंगरे, श्रीमंत योगी लोक कल्याण मंडळाचे राजा महाराज शेंडे, डॉ.गंगाधर नाखले, योग शिक्षक योगेश सुंकटवार, संगीता आगरकर, विद्या पेंडके, माधुरी शिवणकर उपस्थित होते.
यावेळी रा.सु.बिडकर क्रीडा भवनात होमहवन यज्ञ करून आयुर्वेद शिरोमणि परम श्रद्धेय आचार्य बालकृष्ण जी महाराज यांच्या आरोग्या व दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली वृक्ष पुजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली याप्रसंगी बस स्टॉप चौक हिंगणघाट येथे औषधी गुणधर्म असलेले बेल, आवळा, तुळशी, अर्जुन, आंबा, निंब, जामुन आदी चारशे औषधी वनस्पतींचे रोपे मोफत वाटप करण्यात आले. तर वनऔषधी बाबत मार्गदर्शन करतांत डॉ.गंगाधर नाखले म्हणाले की, कडुनिंब ही एक अतिशय चांगली वनस्पती आहे जी मुबलक प्रमाणात आढळते. या वृक्षापासुन मोठ्या प्रमाणावर आक्सिजन मिळतो त्याचे औषधी गुणधर्म हजारो वर्षांपासून भारतात ज्ञात आहेत. कडुलिंबाची पाने चघळल्याने रक्त शुद्ध होते. त्वचेचे विकार बरे होतात कडुलिंबाने दात घासल्याने दात आणि हिरड्या मजबूत होतात, दात किडणे थांबते आणि श्वासाची दुर्गंधी थांबते कडुनिंबाची झाडे जीवनाशी निगडीत आहेत अशा अनेक आयुर्वेदिक वृक्षाची माहिती समाजात होण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत व आधुनिक काळात जडीबुटी चा वापर वाढणे काळाची गरज असल्याचे मत डॉ .नाखलेयांनी व्यक्त केले.
प्राणवायू आणि शुद्ध हवा यासाठी विविध प्रकारची झाडे कडुनिंब, वड, पीपळ यांना महत्त्व दिले आहे, म्हणून देशी वृक्षांचे वृक्षारोपण करा असे आवाहन राजा महाराज शेंडे यांनी केले. याप्रसंगी दत्त मंदिर वार्ड हिंगणघाट येथील पंचशील हनुमान मंदिर परिसरात विस वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमाचे संचालन प्रा.अजय मोहोड तर आभार रामानंद चौधरी यांनी मानले. या कार्यक्रमाला ज्ञानेश्वर खडसे, प्रमोद भाईमारे, प्रा.सुरेश दिविले, प्रा.अनिल तरोडकर रवि भालेराव पुरणलाल जैस्वाल, वैभव निनावे, परमेश्वर खडसे, आयुष हावगे, मनोहर झोंटींग, सुभाष ठाकरे, राजु भगत, शांताराम शिवरकर, अनिल भाईमारे, प्रकाश डहाके, राजेंद्र वरखेडे, वामनराव तडस शुक्राचार्य झामरे, सुधाकरसायंकार, शरदचंद्र बाकळे, दिलीप धिया, रोषन नागमोते, बंडू बाकरे, सुनील डोळस, भोलेश्वर देवतळे, जगदीश राऊत, उमेश कामडी, विजय कापटे, सोमदेव कापटे, योगेश कामडी, सतीश कामडी सह गावातील प्रतिष्ठित नागरिक, पतंजलि योग परिवारचे पदाधिकारी, योग शिक्षक, सहयोगी योग शिक्षक, कार्यकर्ता, योग साधक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

