मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 2 ऑगस्ट ला हिंगणघाट येथे विदर्भ विभाग महिला ओबीसी महासंघाची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकी मध्ये राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे 9 वे अधिवेशन दरवर्षी प्रमाणेच येत्या 7 ऑगस्ट 2024 ला गोल्डन ज्यूबली, गुरूनानक भवन अमृतसर (पंजाब) येथे होणार असल्याने त्याची पुर्व तयारी ह्या मिटींग मधे करण्यात आली.
ही बैठक राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघाच्या अध्यक्षा सुषमा भड, राष्ट्रीय कार्याध्यक्षा शरयु तायवाडे, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा ज्योती ढोकणे यांच्या मार्गदर्शनाने विदर्भ विभाग अध्यक्षा विजया डाॅ.संजय धोटे नागपुर यांच्या नेतृत्वात हिंगणघाट येथे घेण्यात आली. ह्या बैठकीत खालील विषयावर चर्चा करण्यात येवुन काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. महिला महासंघाची कार्य भुमिका ही महिलांना वैचारीक चळवळीतून अनिष्ठ रूढी-प्रथा परंपरा, अन्याय, अत्याचार, शोषण, यातून सुटका व्हावी. त्यांचा वैचारीक विकास व्हावा. ओबीसी नारीशक्ती महीला परीवार म्हणजेच नारीशक्ती जागरातुनदेशाची भावी पिढी घडावी. घराघरातील आजची आई माँ साहेब जिजाऊ प्रमाणे सशक्त व सक्षम बनावी. खरी सावित्रीची लेक बनावी. ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करण्यात यावी. ओबीसी महीलांना राजकीय क्षेत्रामध्ये 33% आरक्षण लागू व्हावे. ओबीसी महीलांना उद्योग क्षेत्रामध्ये नगण्य असणारे संख्या स्थान आहे, त्यांना विशेष प्राधान्य मिळावे. देशातील व महाराष्ट्र राज्यातील ओबीसी समाजावर जातनिहाय जणजगणना न केल्यामुळे होणार्या अन्यायकारी मुद्यांवर ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे आणि संपूर्ण महासंघ पदाधिकारी सातत्याने अभ्यासपूर्ण मागण्या सरकार समोर मांडत असतात व पाठपुरावा करतात. सरकारचे लक्ष बहूसंख्य अशा ओबीसी समाजातील महीलांच्या समस्यावर केंद्रीत करण्यात राष्ट्रीय ओबीसी महीला महासंघाची सुद्धा मौलीक भूमिका व योगदान आहे. असे प्रतीपादन विदर्भ प्रदेश अध्यक्षा विजयाताई संजय धोटे नागपूर यांनी केले.
तसेच संपूर्ण विदर्भ प्रदेश महीला पदाधिकारी व कार्यकारीणी सदस्य अशा सर्वांचे योगदान मिळत असते. ह्या मिटींग मधे प्रामुख्याने विदर्भ विभाग कार्याध्यक्षा संगीता पुसदेकर, विदर्भ विभाग महासचिव चंदा येलेकर, विदर्भ विभाग सहसचिव कविता पुसदेकर , विदर्भ विभाग मुख्य संघटिका कल्पना हिवंज, विदर्भ विभाग संघटिका विद्या गिरी, विदर्भ विभाग सचिव माधुरी मालेकर, विदर्भ विभाग सह संघटिका शितल शेंडे, विद्या देशमुख, वैशाली ठाकरे, निता गजभे, सविता बाकडे, मोनाली नांदुरकर, सिमा मख, सौ. कल्यानी शर्मा, सिमा काळे, दिपाली काळे, आरती चंदेल. इत्यादी हजर होते.