मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- नारायण सेवा मित्रपरिवार हिंगणघाट चे वतीने स्थानिक कटारिया हॉस्पिटलमध्ये निशुल्क नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. नागपूर येथील सुप्रसिद्ध नेत्र तज्ञ डॉक्टर विजय जेसवानी यांनी रुग्णांचे डोळ्याची तपासणी केली .सदर् शिबिरात प्रामुख्याने बेघर निवारा आश्रम मधील वृद्ध व निराधार यांच्या डोळ्याची तपासणी करण्यात आली. सर्व रुग्णांना डोळ्यात टाकण्याकरीता ड्रॉप देण्यात आले.
या कार्यक्रमाचे आयोजनाकरीता नारायण सेवा मित्र परिवारा चे अध्यक्ष महेश अग्रवाल, ताराचंद सिंघवी, दुर्गाप्रसाद यादव, प्रा. किरण वैद्य, मनोज सिंघवी, विपिन खींवसरा, संजय मानमोडे, किशोर जेस्वानी, मिलिंद दिक्षित, लक्ष्मण डहाके, अतुल पलांडे, अनुराधा मोटवानी, नेहा मोटवानी, बबिता जोशी, कंचन खींवसरा, गायत्री निनावे आणि पदाधिकारी व सदस्यांनी आता परिश्रम घेतले.