उषाताई कांबळे सांगली शहर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- बौद्ध धम्म संस्कार संघ श्रावस्ती विहार सांगली, याच्या वतीने वर्षावासच्या अनुषंगानेआषाढ महिन्यातील आज रविवार दिनांक 04 ऑगस्ट रोजी सकाळी 10 ते 11 वर्षावासच्या पंधराव्या दिवसाच्या सत्रामध्ये आयुष्यमान सी.बी. चौधरी विहाराचे संचालक तसेच माजी उपायुक्त यांची धम्मदेशना आयोजित केली होती.
यावेळी महाकरुनीक तथागत भगवान बुद्ध तसेच विश्वरत्न विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून कार्यक्रमास सुरुवात झाली. “जेथे शिलाचे आचरण केले जाते, तेथे बुद्धाच्या गुणाचा उगम होतो, त्याचा निवास होतो, त्याचा विकास होतो आणि धम्म आचरणआतूनच सुखाची निर्मिती होते, आणि मानवी जीवन सुखमय होते. या घोषवाक्याने धम्मदेशना देण्यास सुरुवात झाली.
आषाढ पौर्णिमेस महाकारूणीक तथागत भगवान बुद्धाचे जीवनामध्ये घडलेल्या घटनाची माहिती थोडक्यात सांगण्यात आली. आषाढ पौर्णिमेस भगवान बुद्धाच्या जीवनामध्ये एकूण सात घटना घडलेल्या आहेत. प्रत्येक पौर्णिमेस विशेष आणि अनन्य साधारण महत्त्व आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिले असता पौर्णिमेला आकाशात मंद वारा वाहतो असतो, चंद्राचा आकार पूर्णपणे गोल आणि तेजस असतो. त्याचा प्रकाश आपणास सुखावत वाटतो. या कालावधीत समुद्र /सागरास भरती येते, भरती येणे म्हणजेच पौर्णिमेच्या दिवशी चंद्राचा आप म्हणजे पाण्याशि संबंध येत असतो, तसेच तेज वायू आणि पृथ्वीचा ही संबंध येत असतो. या पाच एकत्रित धातुनी आपले शरीर बनलेले आहे आणि त्यातील सर्व तत्वे आपल्यात असल्याने व पृथ्वीवर आपण राहत असल्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष पृथ्वीवरील प्रत्येक सजीवांचा यामध्ये अंतर्भाव होतो या दिवशी पृथ्वीवरील गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे मानवाच्या मनावर खूप मोठे परिणाम होत असतात. ते चांगले किंवा वाईटही असतात काही वेळा मन ही या कालावधीत विक्षिप्त आणि मनोविकार आणि प्रेरित होत असते त्यामुळे त्यावर उपाय म्हणून सर्वांनी अष्टशील धारण करून उपोसथ व्रत करणे आवश्यक आहे. धम्माचा केंद्रबिंदू माणूस असल्याने कुशल कर्म करणे आवश्यक आहे असे सांगितले.
त्याचप्रमाणे सर्व संस्काराचे उगमस्थान मन हे आहे. बौद्ध धम्मामध्ये पंचशीला सर्वात महत्त्वाचे स्थान आहे पंचशील म्हणजे प्रार्थना याचना मागणी नव्हे पंचशील ग्रहण करीत असताना भगवान बुद्धांना काही मागणी करत नसतो तर त्यांच्या पवित्र मूर्तीला साक्षी ठेवून आपण आपणावर काही बंधने घालून घेत असतो हे जरी बंधन वाटत असले तरी ते आपल्या सर्वांच्या कल्याणाकरिता आणि दुःख मुक्ती करिता आहे हे सर्वांनी जाणून घेणे आवश्यक आहे. बौद्ध धम्मा मध्ये अनमोल तीन रत्ने आहेत बुद्ध धम्म आणि संघ याचा आपण काया वाचा आणि मनाने अनुसरण करणे आवश्यक आहे. दीघ निकाय 1.44 समय फल सुत्त बुद्ध रत्नांची व्याख्या “इतपिसो भगवा अरहम सम्मासम्बुद्ध विजा चरण संपन्ननो सुगतो लोकविदू अनुतरो पुरीस दम सारथी”हे पाली भाषेतील दिघ निकाय मधील समय फलसुत्त आहे त्याचे मराठी मध्ये उच्चारून उच्चारण समजून सांगितले असे आहे.
भगवान म्हणजे ज्याने राग, रोग आणि मोह नष्ट केलेले आहेत, ते भगवा भगवान बुद्ध होय भगवान बुद्धाचा मुख्य संदेश म्हणजे अत्त दीप भव म्हणजे “स्वयं प्रकाशित व्हा” विद्याचरण संपन्न एकूण विषय आठ आहेत. चरण म्हणजे आचरण होय. आचरण हे 15 प्रकारचे आहेत. लोक विदू म्हणजे लोक विदित असणे, 31 प्रकारचे लोक आहेत. अधोगती लोक त्यामध्ये चार प्रकारचे लोक आहेत. मनुष्य लोक, देव लोक सहा आहेत. ब्रह्मलोक व रूपलोक 16 आहेत. चरण म्हणजे आचरण हे 15 प्रकारचे आहेत. त्याची माहिती सविस्तर सांगितली.
अशाप्रकारे महापरित्राण पाठ दररोज विहारांमध्ये घेणेबाबत यापूर्वी भंते डॉक्टर यश काश्यपायन यांनी पौर्णिमेच्या धम्म देशनेच्या वेळी तर जितेंद्र कोलप यांनी रविवारच्या सत्रा मध्ये एक बुकलेट तयार करून सुरुवात करण्याच्या सूचना केलेल्या आहेत ते कसे आवश्यक आहे याची माहिती सांगण्यात आली, धम्म हा अनुसरण्याचा असून बुद्धीच्या जोरावर तो चालत नसतो बुद्धीवादी लोक किंवा अकुशल करणारे लोक अधोगतीला पोहोचतात याचे उदाहरण धम्मपदातील पहिले पद मनो पूबगमा धम्मा… चे उदाहरण देऊन पटवून सांगण्यात आले. त्रिसरण,पंचशील, बुद्ध पूजा, महामंगल सुत्त इत्यादी जीवनावश्यक बाब असल्याचे सांगितले आहे. त्याचे विहारामध्ये पठण करण्याच्या सूचना केल्या.
खरे पाहिले तर विहारांमध्ये विहाराचे माजी सचिव प्राध्यापक अशोक उदयभांजी भटकर सर यांची धम्मदेशना होणार होती यांचे मेव्हण्याचे अचानक निधन झाल्याने त्यांना वर्धा येथे जावे लागल्यामुळे त्यांनी महानिबान सूत दिघनिकाय 2.3.202 नुसार लुंबिनी बोधगया सारनाथ कुशिनारा या चार पवित्र स्थळांना भेटी देणे आवश्यक असल्याचे भगवान बुद्ध आणि महापरिनिर्वाण होते वेळेस भंते आनंदा ला सांगितले होते त्याचे वाचन शेवटी केले. त्यानंतर भटकर सराचा मेहुणे यांना विहारा मार्फत आदरांजली वाहण्यात आली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सह खजिनदार जगन्नाथ आठवले यांनी केले. तसेच विहाराचे अध्यक्ष डॉ. सुधीर कोलप यांनी पाहुण्यांचे आभार मानून पुढील गुरुवारी भंते डॉक्टर यश काशपायन महाथोरो हे चार ते सहा या वेळा मध्ये धम्मदेशना देतील त्याचप्रमाणे शुभम संभाजीराव माने हे महाराष्ट्र पब्लिक सेवा कमिशन मध्ये चांगल्या मार्काने उत्तीर्ण होऊन त्यांची नियुक्ती औरंगाबाद येथे झाली म्हणून त्यांचा सत्कार सी.बी. चौधरी यांच्या हस्ते करण्यात आला . अन्य दोन उपासक यांची सुद्धा महाराष्ट्र सेवा पब्लिक कमिशन परीक्षा उत्तीर्ण झाल्या बाबत त्यांचे अभिनंदन करण्यात आले. विहाराचे सचिव पवन वाघमारे यांनी संडास बाथरूम चे शेवटच्या टप्प्यात आलेले काम पूर्ण करण्याच्या दृष्टीने अर्थ दान देणेबाबत सर्वांना विनंती केली धम्मपालन गाथा होऊन कार्यक्रमाची सांगता झाली.

