चार लाखांचा पाच घनमीटर माल पकडला पण आरोपी मिळेना.
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सिरोंचा:- तालुक्यातील व महाराष्ट्र- छत्तीसगड राज्याच्या सीमेला लागून असलेल्या भागातून इंद्रावती नदीमार्गे सागवानाची तस्करी होत असल्याची माहिती मिळताच झिंगानूर वनपरिक्षेत्र कार्यालयाने शोधमोहीम राबवून 4 लाख 9 हजार 60 रुपयांचा एकूण 5.663 घनमीटर सागवान लड्डे जप्त करण्यात आले. ही कारवाई 30 जुलै रोजी दुपारी 3 ते सायंकाळी 5 वाजेदरम्यान करण्यात आली.
इंद्रावती नदीत्रातून सागवान लठ्ठ वाहून नेत असल्याची माहिती झिंगानूर वनपरिक्षेत्र कार्यालयाला मिळताच वनपरिक्षेत्रातील सर्व क्षेत्रीय वनकर्मचारी तसेच वनमजूर यांना सोबत घेऊन छत्तीसगड राज्याचा सीमेलगत इंद्रावती नदीपात्रात शोध मोहीम सुरु केली असता 30 जुलै रोजी दुपारी 3 ते सायंकाळी 5 वाजेदरम्यान अवैधरित्या सागवान तराफे नदीपात्राच्या पाण्यात वाहत येत होते. पाच तराफ्यात एकूण 30 सागवान लड्डे होते. एकूण 4 लाख 9 हजार 60 रुपयांचा 5.663 घनमीटर माल जप्त करण्यात आला. सदर कारवाई झिंगानूरचे क्षेत्रसहायक बेपारी तसेच वनरक्षक तिरुपती सडमेक, महेंद्र हिचामी, संजय मडावी, आशिष कुमरे, अशोक गोरगोंडा, राम कोरामी, गणेश मेश्राम, लुमेश चौधरी, नितेश कोरेत, संजय उसेंडी, विजू मडावी, सुधाकर माहाका, बालाजी सोनकांबळे, मांतेश सिडाम, रामनीलेश मडावी, बक्का मडावी, सुभाष मडावी, समय्य आत्राम, रामन्ना कोंडागोर्ला, सुधाक गावडे यांनी केली. या प्रकरणाचा अधिक तपार झिंगानूरचे परिविक्षाधीन वनपरिक्षेत्र अधिकारी पी. व्ही. रेड्डी यांच्या नेतृत्वात सुरु आहे.

