मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- जिल्हात सर्वत्र मुसळधार पाऊस कोसळत असल्यामुळे अनेक रस्ते वाहून गेली आहे. त्यात अनेक रस्तात मोठ मोठे खड्डे पडले आहे. त्यात आलापल्ली ते सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग असून बहुतांश ठिकाणी पुलियाचे काम संथ गतीने सुरू असून पुलाच्या बाजूला काही ठिकाणी मोरूम टाकून आहे आणि जडवाहतूक या मार्गांवरून जात आहेत. जडवाहतूक बंद असून सुद्धा राजरोज पणे जडवाहतूक सुरु आहे.
संततधार व मुसळधार पाऊसाने येथील रस्ते निमलगुडम ते गोलाकर्जी पर्यंत चिखलमय झालेले आहे. जाणाऱ्या राष्टीय मार्गावर ट्रक रस्त्याच्या आडव्या बाजूने उभा होऊन रहदारी बंद झालेले आहे. पहाटे पासून राष्टीय महामार्ग आलापल्ली गुड्डीगुडम, गोलाकर्जी, रेपनपल्ली, जिमलगट्टा, सिरोंचा कडे जात असलेले ट्रक छल्लेवाडा मोडी जवळ फसून असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या मार्गांवर जडवाहतूक बंदी असल्यावर सुद्धा राजरोज पणे सुरळीत आहेत. या कडे तात्काळ लक्ष देण्याची मागणी ये, जा करण्याऱ्याकडून जोर करीत आहे.