मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- येथील प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी जागा पाहण्याकरिता आयुविज्ञान समितीच्या टीम आज हिंगणघाट येथे आली होती. यावेळी हिंगणघाट, समुद्रपूर तालुक्यातील परिसरात जागेची केली पाहणी केली. यावेळी आयुर्विज्ञान समिती, आमदार समीर कुणावर, वर्धा जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी, नगर परिषद अधिकारी यांच्यासह सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी हिंगणघाट येथील प्रस्तावित वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेची पाहणी करण्यासाठी आलेल्या आयुर्विज्ञान समितीला आज हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालय परिसरातील जागा पाहणी केली. त्यानंतर सर्व नांदगाव येथे जागा पाहण्यासाठी गेले. तिथून कोल्ही येथील जागा पाहण्यासाठी जात असल्याचे बोलून थेट समुद्रपूर तालुक्यात येत असलेल्या जामच्या हद्दीत जागा या समितीला दाखवण्यात आल्याने हिंगणघाट मध्ये शासकीय मेडिकल महाविद्यालय होणार यावर शंका उपस्थित झाल्या आहे.
हिंगणघाट शहरातील जनतेने, संघर्ष समिती, महिला समिती, सामाजिक कार्यकर्ते, सर्व पक्षीय नेते मंडळी यांनी मिळून 200 पेक्षा जास्त दिवस हिंगणघाट पासून तर मुंबई पर्यंत विविध प्रकारचे आंदोलन केली. त्यात महिला समितीने शासकीय मेडिकल कॉलेज हे उपजिल्हा रुग्णालय परिसरातील जागेत व्हावे म्हणून अन्न त्याग आंदोलन केले होते. पण जागेची पाहणी करण्यासाठी आलेल्या आयुर्विज्ञान समितीला समुद्र्पुर तालुक्यातील जागा दाखविण्यात आली. यावेळी समितीने त्या जागेला सर्वाधिक पसंती दिल्याचे पण सूत्रांकडून माहिती मिळून आल्याने परत एकदा हिंगणघाट शहरातील नागरिकाच्या तोंडाला पाने पुसली जाणार असल्याची चर्चा हिंगणघाट शहरात रंगली आहे.
अगोदर वेळा येथील मल कन्स्ट्रक्शन या शेकडो कोटीचा शासकीय बोजा असलेल्या कंपनीच्या खाजगी जागेचा प्रस्ताव स्थानिक प्रशासनाने पाठवल्याने आमदार समीर कुणावर यांच्यावर मोठ्या प्रमाणात आरोप करण्यात आले होते. या प्रकरणी त्यांच्यावर प्रश्न चिन्ह उपस्थित करण्यात आले होते. त्यामुळे मल कन्स्ट्रक्शन कंपनीच्या खाजगी जागेचा प्रस्ताव आमदार समीर कुणावर यांच्या अंगावर आल्या नंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाट शहर जवळ असलेल्या शासकीय जागेवर होईल असे आमदार समीर कुणावर यांनी सांगितले होते. पण आज जागा पाहण्यासाठी आलेल्या आयुर्विज्ञान समितीला समुद्रपूर तालुक्यातील जागा दाखवण्यात आल्याने आगामी विधानसभा निवडणुकी पूर्वी समुद्रपुर तालुक्यातील मतदारांना खुश करण्यासाठी जाणून बुजून हा अट्टाहास केल्याने एका डावात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न तर नाही केला ना? असा प्रश्न आज हिंगणघाट शहरातील सर्व सामान्य नागरिक विचारत आहे.