उषाताई कांबळे सांगली शहर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- बौद्ध धम्म संस्कार संघश्रावस्ती विहार सांगली यांच्या वतीने वर्षवासाच्या अनुषंगाने आषाढ महिन्यातील आज गुरुवार दिनांक 8 ऑगस्ट रोजी सायंकाळी चार ते सहा वाजता वर्षावासाच्या 18 व्या दिवशी पूजनीय भंते डॉक्टर यश काशपायन महाथेरो हे उपस्थितीत प्रथम करुनेचे महासागर तथागत भगवान बुद्ध, सिम्बॉल ऑफ नॉलेज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना धूप दीप पुष्प ने अभिवादन करून धम्मदेशना देण्याच्या कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.
त्यानंतर धम्मपदाने भन्तेजी यांनी धम्मदेशना देण्यास सुरुवात केली. भगवान बुद्धांना करुनेचे महासागर म्हणतात, तसेच त्यांना अरहंत सुद्धा म्हणतात. अर्हत म्हणजे परिपूर्ण जीवन दहा बंधनातून जे मुक्त होतात. त्यांनाच अर्हत म्हटले जाते. दहा बंधना पैकी एका सुद्धा बंधनातून मुक्त होणे, खूप कठीण आहे. भगवान बुद्धांना सम्यक सबुद्ध म्हणतात. राजकुमार सिद्धार्थ गौतम वयाच्या 35 व्या वर्षी सम्यक संबुद्ध झाले. यापूर्वी अनेक बुद्ध झालेले आहेत, पण त्या सर्वांना पश्चेय बुद्ध म्हणतात. त्यांना पश्चेय बुद्ध का म्हणतात तर बुद्ध ही एक संकल्पना आहे. मनुष्य व मनुष्य जगाचे निरीक्षण केले पृथ्वीचे निरीक्षण केले तर जेव्हापासून मनुष्याची निर्मिती झाली तेव्हापासूनच पृथ्वीवर सुखाची निर्मिती झाली आहे आणि सुखा पाठोपाठ दुःखाची पण उत्पत्ती झाली आणि या दुःखाच्या उत्पतीला साधून सुखाच्या उपलब्धीला प्राप्त व्हावयाचे आहे. सम्यक संबोधी ही एक संकल्पना आहे.
भंते पुढे बोलताना म्हणाले की, जरी अनेक सम्यक संबुद्ध झाले असले तरी त्यांनी धम्माचा प्रचार केलेला नाही, बुद्धत्व प्राप्त होणे वेगळे आणि धम्माचा प्रचार करणे वेगळे आहे. यापूर्वीच्या बुद्धांना ज्ञान प्राप्त झाले तरी त्यांनी लोकांना धम्म सांगितला नाही. पण सम्यक संबुद्ध यांनी सर्व मानव समाजाला चरक भिकवे चारीके करत सतधम्म सांगितलेला आहे. माणसाला परम सुख प्राप्त करून घ्यावयाचा मार्ग भगवान बुद्धाने सांगितला आहे. एक माणूस छन्नी आणि हातोड घेऊन फिरत होता. त्या नगरीच्या राजाला हा माणूस आढळून आला. तो काहीतरी कलाकार आहे म्हणून राजाने त्या माणसाला बोलविले आणि प्रत्यक्ष राजा म्हणाले तू चिनी आणि हातोड्याने काय करतोस तो म्हणाला महाराज मी मूर्ती घडवितो मूर्ती घडवणे हा एक मार्ग वेगवेगळ्या अर्थाने शब्द आहे मूर्तिकार माणूस म्हणतो मी तथागतांची मूर्ती घडवतो तुम्ही थोडा वेळ समोरच थांबा आणि मूर्ती कशी घडवली जाते हे पहा मूर्तिकार चिनी आणि हातोडा एका दगडाजवळ घेऊन जातो उभा राहतो आणि दगडावर चिणीने नाजूकपणे घाव मारून त्याचे तुकडे करू लागतो. त्यावर राजा म्हणाला अरे हा तर दगड तो फोडून टाकणार. तू कसली मूर्ती निर्माण करतोस माणूस म्हणतो महाराज मी मूर्ती करीत नाही, किंवा बनवीत नाही, मूर्ती ह्या दगडामध्येच बसलेली आहे. मी फक्त दगड रुपी कचरा मळ बाजूला करीत आहे. तुम्ही प्रत्यक्ष डोळ्यांनी बघा मूर्ती प्रत्यक्ष दगडामध्येच बसलेली आहे जसा दगड छाटत गेला तसतसं मूर्ती आकार घेत होती आणि या गोष्टीवरूनच बुद्ध म्हणजे नेमके काय तर अनित्य बोध होय. चित्तमळ त्याला चित्तमळ म्हणतात. चित्तमळ हा नष्ट करून जे उरते तो प्रकाश होय तोच उजेड होय आणि म्हणून भगवान बुद्ध या जगातील लोकांना सांगतात मी तुमच्या सुखाची हमी घेतो केवळ आणि केवळ बुद्ध सुखाची हमी घेतात. अहंकार कशाला म्हणतात याबाबत त्यांनी भटकर सरांचे उदाहरण दिले.
भटकर सर नेहमी भंतेजी यांना म्हणतात तुम्ही वारंवार धम्मदेशना देत असताना तुमचे शिक्षण आणि सर्व जग फिरले असे का सांगता यावरून तुमचा अहंकार दिसून येतो हा सुद्धा माझ्यात अहंकार आहे हे दिसून येते अहंकार वेगवेगळ्या प्रकारचे आहेत कोणाला काळे केसाचा तर कोणाला पांढरे केसाचा तर कोणाला ऐश्वर्याचा तर भाषेचा राज्याचा अहंकार आहे भगवान बुद्ध म्हणतात द्वेष सोडा. द्वेष म्हणजे दुसऱ्यांना प्राप्त होणारे सुख न पाहवल्याने अहंकार निर्माण होतो. तुम्ही मोह सोडा. मोह म्हणजे जे आहे, नाही ते होय अशा प्रकारे भगवान बुद्ध एका एका पायरीने धम्म सांगतात. ज्यांच्या कानावर बुद्धांचे शब्द पडले ते शुद्ध झालेले आहेत. बुद्ध कोणतीही गोष्ट तीन वेळा सांगतात. बुद्ध केवळ प्रत्येकाच्या चित्ताला जाणत होते. नाग हा शब्द म्हणजे नाग म्हणल्यावर आपल्यासमोर सरपटणारा प्राणी आपण समजतो, पण सरपटणाऱ्या प्राण्याला पाली भाषेमध्ये पूरक किंवा सर्प असे म्हणतात. हत्तीला पाली भाषेमध्ये नाग म्हणतात. हत्ती हे वैभवतेचे प्रतीक आहे माणसाच्या मनामध्ये मोठे वैभव हत्ती सारखे असणे आवश्यक आहे. भगवान बुद्धांच्या उपासकांना नाग म्हणतात. जटील म्हणजे जटाधारी लोकांना बुद्धांनी धम्म सांगितला जन्म आहे म्हणजे मृत्यू आहे ही गोष्ट पृथ्वीवरील माणसाने लक्षात घेतली तर मनुष्य कोणाचाही द्वेष करणार नाही. कपट करणार नाही. बुद्धांच्या शिष्यांना नागलोक हे नाव पडले आहे. पाली भाषेमध्ये केवळ आणि केवळ भगवान बुद्धांच्या शिष्यांनाच नाग म्हणतात.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूरला दीक्षा घेतली नागपूर हे त्या भूमीचे नाव होते. नाग भूमी त्या शहराचे नाव होते परंतु नंतर नागपूर हे नाव पडले तिथे नाग लोकांची वस्ती होती. देशांमध्ये वैदिक आणि श्रमण परंपरा यांच्यामध्ये संघर्ष आपणाला आढळून येतो. भगवान बुद्धांच्या परंपरेला श्रमण आणि दुसरे श्रमण म्हणजे जैन होय विनय धर्म माणसाने धारण करणे म्हणजे विनय चार प्रकारचे असतात स्त्रोतापन्ना, सकृता गामी, अनागामी आणि अरहंत हे होय. बुद्धांना जीनच म्हणतात आणि महावीरालाही जिनच म्हणतात नाग म्हणजे सर्प जनावर नव्हे बुद्धाच्या सुमार्गावर मार्गावर चालतात त्यांना नाग म्हणतात आणि म्हणून नागांची पूजा केली जाते. परंतु वैदिक लोकांनी त्या सरपटणाऱ्या प्राण्यांची पूजा जोडून टाकून नागपंचमी सुरू केली. बौद्ध धर्मीय लोक नागपंचमी करू शकतात. पण त्यांनी त्रिसरण, पंचशील, बुद्ध पूजा, महामंगलसूत् महापरित्राण पाठ करणे आवश्यक आहे.
बौद्ध धम्म संस्कार संघ श्रावस्ती विहार आणि चार ते सहा ही वेळ खास करून सर्व महिला वर्ग उपासिका उपासक यांच्यासाठी खास स्वरूपाने निश्चित केली आहे कारण उपासिका यांच्यावर संस्कार झाले की ते सर्व कुटुंबावर संस्कार करतात. त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी वर्षावास पावन पर्वचा भाग घेऊन लाभ घेणे आवश्यक आहे. असे डॉक्टर यश काशपायन महाथेरो भतेजींनी सर्व उपाशीकायांना आवाहन केले तसे त्यांना स्वतः पुढील गुरुवारी भ्रमणध्वरी द्वारे उपस्थित राहणे बाबत विनंती करीत असल्याचेही सांगितले धम्मपालन गाथां होऊन कार्यक्रमाची सांगता झाली.
या कार्यक्रमास संचालिका उपासिका उषा कांबळे, दीपा कांबळे उपाध्यक्ष सुनिता पारमीत धमकीर्ती तसेच संस्थेचे खजिनदार एस.आर.माने सर, सी .बी. चौधरी, काटे, संजीव साबळे सर, विजय लांडगे इत्यादी उपस्थित होते. या सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली. येत्या रविवारी सकाळी दहा ते अकरा वेळेत सर्वांनी वर्षावासाच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने उपस्थित राहणे बाबत विनंती करून कार्यक्रमाचा समारोप झाला. .

