उपपोलीस स्टेशन धाबा यांची कौतुकास्पद कामगिरी -स्वप्नील अनमूलवार
भारतीय जनता युवा मोर्चा धाबा मित्र परिवारतर्फे ठाणेदारांचा व कर्मचाऱ्यांचा सत्कार
राजेन्द्र झाडे, चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनिधी
मो नं 9518368177
चंद्रपूर:- जिल्हातील संत नगरी श्रीक्षेत्र धाबा उप -पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुशील धोकटे यांनी कायदा सुव्यवस्था कायम राखण्यासाठी केलेल्या नियोजनाबद्धल व उत्तम कामगिरीची दखल घेऊन धाबा भारतीय जनता युवा मोर्चा मित्रपरिवारतर्फे 19 सप्टेंबर 2022 रोजी त्यांचा शालश्रीफळ, पुष्पगुछ, शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. तसेच धाबा उप -पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचाऱ्यांचे सुद्धा उष्पगुछ व शब्द सुमनाने सत्कार करण्यात आला.
यंदा मात्र निर्बंधमुक्त सर्व धार्मिक सण, उत्सव अत्यंत शांततापूर्ण व मोकळ्या वातावरणात साजरे व्हावे यासाठी यांनी केलेले नियोजनाची सर्व धर्मीय समाज बांधव प्रसंशा करताना दिसत असून यंदाच्या गणेश आगमनापासून विसर्जन मिरवणुकीतपर्यंत धाबा पोलिसांनी केलेल्या कामगिरीचे कौतुक होत आहे. यासर्व बाबी लक्षात घेता यांच्या कामांची दखल घेऊन भारतीय जनता युवा मोर्चा मित्रपरिवार यांच्या कडून सत्कार करण्यात आला.
यावेळी अरुणभाऊ कोडापे माजी उपसभापती पंचायत समिती गोंडपीपरी, हिराचंद कंदीकुरवार उपसरपंच ग्रा.पं. धाबा, संजय येलमुले सेवा सह.संस्था धाबा, राजेंद्र गोहणे सदस्य ग्रा.पं.धाबा, आशिष मामीडपेल्लीवार, चंद्रशेखर गरपल्लीवार, संतोष येलमुले, विठ्ठल चनकापुरे, निखिल चंदनगिरीवार,गणेश बावणे, हरीश घोगरे, सूरज भस्की,संदीप बावणे, अनिकेत नामेवार, उद्धव हिवरकार, आकाश पोटे, प्रकाश सोयाम, अखिल चंदनगिरीवार, स्वप्नील येलमुले, साईनाथ खारकर,नरेश पोटे, सुरज फरकडे, निखिल पोटे, रितीक हिवरकार, पत्रू हजारे, सुनील पाल व भारतीय जनता युवा मोर्चा धाबा सर्व मित्र परिवार उपस्थित होते.