विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- येथील प्रतिष्ठित नागरिक, कर्मचारी, आदिवासी समाज बांधव, महिला व युवा वर्ग तसेच ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन यांच्या पुढाकाराने आदिवासी जागतिक दिन वीर बाबुराव शेडमाके चौक एटापल्ली येथे आदिवासी संस्कृती, रूढी परंपरेनुसार पूजा विधी करून ध्वजारोहण सोहळा पार पाडण्यात आला.
जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून वीर बाबुराव शेडमाके चौक एटापल्ली येथून ते छत्रपती शिवाजी महाराज चौक एटापल्ली ते आदिवासी सांस्कृतिक भवन (गोटुल) पर्यंत प्रभात फेरी काढण्यात आली. या प्रभात फेरीमध्ये एक तीर एक कमान आदिवासी एक समान, सेवा सेवा जय सेवा अशा जयघोषाने संपूर्ण एटापल्ली दुमदुमली.
आदिवासी सांस्कृतिक भवन (गोटुल) येथे प्रमुख पाहुण्यांचे मंचावर स्वागत करण्यात आले. जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृती, परंपरेचे दर्शन आदिवासी नृत्यामध्ये दाखविण्यात आले. यामध्ये शाळकरी मुलं तसेच गावातील इतरही तरुण युवकांचा समावेश आहे. जागतिक आदिवासी दिनाचा औचित्य साधून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार समारंभ पार पाडण्यात आला. एटापल्ली येथील युवकांनी सेवा सेवा जय सेवा प्रोडक्शनच्या माध्यमातून तालुक्यातील काही प्रेक्षणीय स्थळांमध्ये गोंडी गाण्यावर नृत्याचा शूटिंग करून त्याचा संपूर्ण व्हिडिओच प्रदर्शन प्रोजेक्टरच्या माध्यमातून सादर करण्यात आले. याचा संपूर्ण श्रेय डायरेक्टर श्री. शुभम रापंजी आणि चमु यांना जाते. अतिशय उल्लेखनीय काम आदिवासी युवकांनी केलं यासाठी सर्व समाज बांधवांनी त्यांचा टाळ्यांच्या गजरात स्वागत करून त्यांना अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या संपूर्ण कार्यक्रमाचे संचालन श्री भिवाजी कुळयेटी सर यांनी केलं.