या कार्यक्रमात वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र मानकर यांच्या उपस्तितीत गरोदर मातांना मार्गदर्शन.
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- तालुक्यातील राजाराम खांदला येथे आज दिनांक 10 ऑगस्ट रोजी शनिवार ला गरोदर मातांना मार्गदर्शन करण्यात आले आहे आणि गरोदर मतांना आर्यन गोळ्या आणि दररोज आहारात कोणते भाज्या सेवन करावे, आर्यन सुक्रोज बद्दल मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले.
सद्या पावसाचे दिवस असल्यामुळे स्वच्छता कशी राखता येईल, घरासमोरील घाण, दूषित पाणी, जितकं जमेल तितकं कोमटपाणी पिण्याचा प्रयत्न करावे आणि डासापासून, सावध राहणे, खास करून मछरदाणीचा वापर करावे. डासापासून मलेरिया, टायफाईड, डेंगू, कालरा या महाभयंकर रोग होण्याची दाट शक्यता असते. या बद्दल मार्गदर्शन करण्यात आले आहे. यावेळी गरोदर मातांनी आणि बालकांना तपासणी करण्यात आले आहे.
यावेळी उपस्थित सी एच ओ स्वेता मॅडम उपस्थित होत्या. तर आरोग्य विभागाचे कर्मचारी आरोग्य सेवक भरत कुंबारे, परिचारिका निलीवार, अंगणवाडी सेविका राजेश्वरी सोयाम, गटप्रवर्तक मुन्नी चापले, आशा सेविका, शीतल पोरतेट, पुष्पा दुर्गे, रंजन्ना दुर्गे आदी उपस्थित होते.