देवेंद्र सिरसाट, हिंगणा नागपूर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटात हिंगणा तालुक्यातील अनेक नागरिकांनी तरुणांनी जाहीर पक्ष प्रवेश केला. त्यामुळे नागपूर ग्रामीण मध्ये येत असलेल्या हिंगणा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाची ताकत वाढत असल्याचे दिसून येत आहे.
नागपूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजीत पवार) ग्रामीणच्या वतीने हिंगणा तालुक्यातील इसासनी येथे लाडकी बहीण योजना याची माहिती, पक्षप्रवेश व नियुक्ती पत्र वाटप ग्रामीण जिल्हाध्यक्ष शिवराज (बाबा) गुजर, ग्रामीण युवा जिल्हाध्यक्ष सचिन चौहान, हिंगणा तालुका अध्यक्ष बिरू सिंग, इसासनी शहर अध्यक्ष अरविंद कोल्हे, वानाडोंगरी शहर अध्यक्ष आलोक शर्मा, वानाडोंगरी उपाध्यक्ष सोनू वर्मा आणि विकास सिंह आकाश पटेल गौरव सिंह, सत्यप्रकाश सिंह, लोहा सिंह,शुभम सिंह,मंचन सिंह, तनोट सिंह, मीना पाल, कलबाक़ी गुप्ता,आशा देवी, सीता तिवारी, आशा राजभर, सुशीला गुप्ता, ममता पटेल, शिवानी मिश्रा, मनोज यादव, रूपा पाल, रेणु विश्वकर्मा, महिला युवती व तालुक्यातील पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते, या सगळ्या कार्यकर्ता च्या उपस्थिती मध्ये नियुक्ती देण्यात आली.
या कार्यक्रमात शिवशंकर पटेल यांची हिंगणा तालुका सचिव पदी नियुक्ती करण्यात आली तसेच पुष्कर सिंह डिगडोह युवा अध्यक्ष, छोटू पटले वानाडोंगरी सचिव, शिवशंकर तिवारी राजेंद्र शुक्ला, तुलसीदास पेटकर, कृष्णा यादव, सुरेखाताई दुबे, मीनाताई साहू, चंद्रशेखर मिश्रा या सर्वांना नियुक्तीपत्र देण्यात आले.