श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- येथील आदित्य शिक्षण संस्थेच्या आदित्य कृषी अभियांत्रिकी, अन्न तंत्रज्ञान व जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा यशाची पताका फडकावली आहे. भारतीय स्टेट बँकेच्या वर्ग 1 अधिकारी पदी 3 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
आदित्य शिक्षण संस्थेतील कृषी अभियांत्रिकीचा शुभम कुरलुपवाड, जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचा राजू खरात आणि अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयाचा अनिकेत बाभुळगाकर या तीन विद्यार्थ्यांची भारतीय स्टेट बँकेमध्ये वर्ग 1 अधिकारी म्हणून निवड झाली आहे. आदित्य शिक्षण संस्थेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना केवळ परीक्षा आणि पुस्तकी ज्ञान न देता विविध उपक्रम राबवून त्यांच्यातील कला गुणांना वाव दिला जातो. त्यामुळेच येथील विद्यार्थी आयुष्याची शिदोरी आणि चांगले संस्कार घेऊन बाहेर पडतात. आज भारतासह परदेशात मोठ-मोठ्या पदावर आदित्य शिक्षण संस्थेचे विद्यार्थी कार्यरत आहेत. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल आदित्य शिक्षण संस्थेचे मुख्य प्रवर्तक सुभाषचंद्र सारडा, संचालक डॉ. आदित्य सारडा यांच्यासह वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परभणीच्या कार्यकारी सदस्य तथा आदित्य शिक्षण संस्थेच्या संचालिका डॉ. आदिती सारडा, आदित्य कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य अमोल सानप व जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सतीश कचरे अमोल, अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य श्याम भुतडा, उपप्राचार्य डॉ. विकास गरजे, उपप्राचार्य अमर सोळंके यांनी अभिनंदन करत पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या.
आदित्य शिक्षण संस्थेत मिळालेल्या मार्गदर्शनामुळे आष्युला कलाटणी मिळाली
आदित्य शिक्षण संस्थेच्या आदित्य अन्नतंत्रज्ञान महाविद्यालयात २०१९ मध्ये पदवी पूर्ण केली. पदवीचे शिक्षण घेत असताना योग्य वेळी योग्य मार्गदर्शन मिळणे गरजचे असते. आदित्य शिक्षण संस्थेत मिळालेल्या मार्गदर्शनामुळे आज आयुष्याला कलाटणी मिळाली. येथील गुरूजन विद्यार्थी घडवण्याचे काम करत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच आम्ही इथपर्यंत पोहचलो असल्याचे मत : भारतीय स्टेट बँकेमध्ये वर्ग 1 अधिकारी म्हणून निवड झालेल्या – शुभम कुरलुपवाड, राजू खरात आणि अनिकेत बाभुळगाकर यांनी व्यक्त केले.
अभ्यासात सातत्य ठेवा यश नक्की मिळेल- डॉ. आदिती सारडा
आपल्याला काय व्हायचे ते ठरवले पाहिजे. त्या दिशेने वाटचाल करत अभ्यासात सातत्य ठेवले पाहिजे. शिक्षकांणी केलेले मार्गदर्शन आणि आपल्या करिअरवर लक्ष केंद्रीत केले तर यश नक्कीच मिळते. आदित्य शिक्षण संस्थेतील विद्यार्थी गुणवत्तेच्या बळावर यशाची पताका कायम फडकत राहत आहे. त्यामुळे संस्थेसह येथील विद्यार्थ्यांचेही नाव देशाच्या काणाकोपऱ्यात आदराणे घेतले जात आहे. असे प्रतिपादन आदित्य शिक्षण संस्थेच्या संचालिका डॉ. आदिती सारडा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केले.

