मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट 15 ऑगस्ट:- स्कूल ऑफ स्कॉलर्स, हिंगणघाट इथे शालेय परिसरात 78 वा स्वातंत्र्यदिन उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला. कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून शहरातील प्रसिद्ध डॉक्टर विशाल कलोडे व डॉक्टर सौ. प्रियंका कलोडे, शाळेच्या मुख्याध्यापिका कु.शिल्पा चौहान, प्रशासकीय अधिकारी प्रदीप जोशी, शैक्षणिक समन्वयक सारिका नरड, पर्यवेक्षिका श्रीमती ममता दायमा हे मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, त्यानंतर लगेचच आदरांजली व झेंडा वंदन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर भाषण केले.विशेष अतिथी डॉ.विशाल कलोडे आणि सौ प्रियंका कलोडे यांनी प्रेरक भाषण करून स्वातंत्र्य दिनाचे महत्व विद्यार्थ्यांना सांगितले.
इयत्ता दहावीच्या सीबीएससी बोर्ड परीक्षेत सत्र 2024 मध्ये सर्वोच्च गुणवत्ता मिळविलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये कु. नेतल टॉवरी, मास्टर राज केंद्रे, कु. इशिका विंचुरकर आणि मास्टर कार्तिकेय पांडे यांना पाहुण्यांच्या हस्ते पदक देऊन गौरविण्यात आले. मार्चपास्ट आणि कवायती सादरीकरणाने लोकांच्या मनात देशभक्तीची भावना जागृत करणारा सुंदर देखावा निर्माण झाला. शाळेतील विद्यार्थ्यांनी ‘स्वर्ग से सुंदर भारत…’ या समूहिक गीताने भारत देशाच्या उज्वल इतिहासाचा गौरव केला.
यावेळी केजी-२ च्या विद्यार्थिनी मितांश घोडे आणि कु. आर्या झाडे तर इयत्ता दहावीची विद्यार्थिनी ओजस्विनी लोधी आणि इयत्ता चौथीची विद्यार्थिनी तेजस्विनी सातपुते यांनी सुंदर भाषण करून सर्वांना मंत्रमुग्ध केले. संपूर्ण कार्यक्रमाचे संचालन शिक्षिका सचिता भोयर व मयुरी लांजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली मास्टर देवेन माळी व विद्यार्थिनी कु.रीनल तेलंग यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कुमारी सानिध्या बोधाणे या विद्यार्थिनींना केले. यावेळी सर्व विद्यार्थ्यांना मिठाई वाटून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.