राहुल मसुरे जिवती तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक संजय पांडे हे स्थापन करत असलेला नियोजित राष्ट्रीय जनहित पार्टी या पक्षातर्फे चंद्रपूर विधानसभा निवडणुक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती दिनांक 13 ऑगस्ट रोजी शासकीय विश्रागृह चंद्रपूर येथे घेण्यात आल्या.
संजय पांडे यांचे खंदे समर्थक असलेले पोलीस बॉईज असोसिएशन महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद तानाजी वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली या मुलाखती घेण्यात आल्या. सदर मुलाखत देण्यासाठी इच्छुकांची भाऊगर्दी झाली होती, यामधे वंचित बहुजन आघाडी, आम आदमी पार्टी, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी संघटना, सामाजिक कार्यकर्ते, माजी नगरसेवक, ग्रामीण भागातील विविध पक्षातील पदाधिकारी तसेच विविध संघटनांचे अध्यक्ष यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता.
या बैठकीला चंद्रपूर जिल्हा सेवानिवृत्त संघटनेचे जिल्हाध्यक्ष सेवानिवृत्त पोलिस निरीक्षक ए. एल. काटकर, जिल्हा उपाध्यक्ष सेवानिवृत्त पीएसआय श्री. भडके, सेवानिवृत्त पीआय, श्री.गंगाधर पिदुरकर, सेवानिवृत्त एएसआय श्री. सोनकर, सेवानिवृत्त एएसआय श्री. वाघमारे, एपीआय श्री. खोब्रागडे त्याच प्रमाणे चालक संघटनेचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष भास्कर वाढई, भैय्याजी मानकर, वंचित बहुजन आघाडीचे विष्णू चापडे, आशा राजभर, मोहन आत्तेकर, दिलीप उरकूदे, सचिन बुरडकर, सचिन दानव, देविदास बोबडे, विशाल अमूतकर, बशीरभाई अन्सारी, सद्दाम अन्सारी, किरण घाटे, अनिल वैद, मनोज मेंढे, रवी घंटलवार, प्रवीण भुजाडे, केशव किन्नके, अक्षय धानोरकर, अक्षय भिवंगडे, रवी सहस्त्रेबुध्दे,कविता तिमा, सविता खुटेमाटे, अनिता बोनगिरवार, सगीता कुडावले, सुनिता बावणे, ज्योती राऊत, सोनल साकरकर, माया पाझनकर, अनिता पेन्दाम, सुवर्णा खोब्रागडे, समीनदारा बोरकर, अनिता चौधरी, सुनीता बरसागडे, सूर्यकांता जुमनाके, अर्चना ठाकरे, नेहा सारसर यांची उपस्थिती होती.