प्रवीण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि.15:- भारतीय स्वातंत्र्याचा 77 व्या वर्धापनदिनामित्त जिल्हा क्रीडा संकुल येथे आयोजित मुख्य ध्वजारोहण समारंभात विरमाता व विरपत्नींचा सत्कार करण्यात आला. तसेच विविध पुरस्कारांचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान, जिल्हा पोलीस अधीक्षक नुरूल हसन, प्र. अपर जिल्हाधिकारी श्रीपती मोरे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. सागर कवडे, उपजिल्हाधिकारी प्रियांका पवार, निवासी उपजिल्हाधिकारी गणेश खताळे, उपविभागीय अधिकारी दीपक कारंडे यांच्यासह विविध विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
वीरमाता शांताबाई वरहारे, वीरमाता नलिनी विनायकराव टिपले, विरपत्नी जयश्री चौधरी यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्याहस्ते शाल, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. जिल्हा आपत्ती व्यवस्थापनातर्फे जिल्हा शोध व बचाव पथक प्रमुख आरपीआय कमलाकर घोटे तसेच लाहोरी येथील वाघाडी नाल्याला आलेल्या पुरामध्ये टेम्पो वाहुन गेला होता. त्यावेळी टेम्पो मधील 3 व्यक्तींना सुखरूप बाहेर काढल्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
स्काऊट व गाईड राज्य पुरस्कार सन 2021-22 करिता अभिमान फुलमाई, राजवर्धन येवले, देवांश लोहकरे यांना स्काऊट पुरस्कार तसेच भुमी परतेती, नुतन देशमुख यांना गाईड पुरस्कार व प्रशस्तीपत्र देऊन जिल्हाधिकारी यांच्या हस्ते गौरविण्यात आले. पीयुपी परिक्षेत राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत निवडलेले विद्यार्थी रोहन देवेंद्र दाते, संघर्ष संदिप वानी यांना प्रशस्तीपत्र देऊन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान, पोलीस अधिक्षक नुरूल हसन यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
लोकसेवा हक्क अधिनियम 2005 अंतर्गत सन 2023-24 करिता 100 टक्के सेवा देणारे अधिकारी म्हणून जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी अधिकारी सागर तानाजी सांळुखे व आर्वीच्या प्रभारी उपविभागीय कृषी अधिकारी सुप्रिया विजय वायवळ यांना जिल्हाधिकारी यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. कृषी विभागाकडून सुनंदा गणेश चोपडे, रामचंद्र बालाजी युवनाते, माणिक चंद्रभान तिडके, सुर्यभान आत्माराम गाखरे व साहेबराव नारायण तिडके या शेतकऱ्यांना मृदा आरोग्य पत्रिकेचे वाटप जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान, पोलीस अधिक्षक नुरूल हसन यांच्याहस्ते करण्यात आले.
वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण.
भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 77 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात ध्वजारोहण केले. प्र. अपर जिल्हाधिकारी श्रीपती मोरे, निवासी उपजिल्हाधिकारी गणेश खताळे, उपविभागीय अधिकारी दीपक कारंडे, उपजिल्हाधिकारी प्रियंका पवार यांच्यासह अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्री. कर्डिले यांनी यावेळी उपस्थितांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

