संतोष मेश्राम, राजुरा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- भारतीय स्वातंत्र्याचा ७८ वा स्वातंत्र्यदिन इन्फंट काँन्व्हेंट राजुरा येथे इन्फंट जिजस सोसायटी द्वारा संचालित इन्फंट जिजस इंग्लिश हायस्कूल, कल्याण काॅलेज आँफ नर्सिंग, रामचंद्रराव धोटे महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी ठिक ७ : ४५ वाजता संस्थेचे अध्यक्ष अभिजीत धोटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. इन्फंट काँन्व्हेंट च्या विद्यार्थ्यांनी यशस्वीरित्या परेड मार्च पुर्ण करून राष्ट्रध्वजाला सलामी व मानवंदना देण्यात आली. विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले.
यावेळी मार्गदर्शन करताना कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार सुभाष धोटे यांनी सांगितले की, भारतीय स्वातंत्र्यासाठी संघर्ष करणाऱ्या आणि बलिदान देणाऱ्या शुरवीर योद्ध्यांचे स्मरण करण्याचा आजचा पवित्र दिवस आहे. यानिमित्ताने आपण सर्वांनी आपल्या व आपल्या देशाच्या प्रगतीसाठी संकल्पबध्द व्हावे असे आवाहन केले.
या प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा व तालुका स्तरीय विविध क्रीडा स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी संस्थेचे सचिव माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, मुख्याध्यापिका सिमरनकौर भंगू, मुख्याध्यापिका मंजुषा अलोने, मुख्याध्यापक रफिक अन्सारी यासह इन्फंट जिजस सोसायटी द्वारा संचालित सर्व शाळा, महाविद्यालयांचे प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन विद्या चौधरी यांनी केले.