प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार सुरेश देशमुख यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी खासदार अमर काळे, जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, जिल्हा निरिक्षक राजा टाकसाळे, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी उपस्थित राहून माजी आमदार सुरेश देशमुख यांना त्यांच्या उदंड आयुष्यासाठी आणि भविष्यकाळातील यशस्वी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार सुरेश देशमुख यांनी सहकार क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान दिले. बापुरावजी देशमुख यांच्या सामाजिक कार्याचा वसा सुरेश देशमुख यांनी आपल्या खांद्यावर घेऊन सर्व पक्षीय सर्व समाजाला घेऊन त्यांनी सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले. त्यांच्या समाजसेवेत त्यांनी दिलेले योगदान आणि त्यांच्या कार्याबद्दल आदर व्यक्त करत त्यांच्या पुढील वाटचालीत अधिक यश आणि आरोग्य लाभावे अश्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.