Sunday, March 1, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

ई-पिक पाहणीची जाचक अट रद्द करा सलील देशमुख यांची मागणी. सरसकट अनुदानासाठी जिल्हाधीकाऱ्यांना निवेदन.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
August 18, 2024
in Uncategorized
0 0
0
ई-पिक पाहणीची जाचक अट रद्द करा सलील देशमुख यांची मागणी. सरसकट अनुदानासाठी जिल्हाधीकाऱ्यांना निवेदन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपूर

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसुन सोयाबीन व कापुस उत्पादकांना ५ हजार रुपये दोन हेक्टरपर्यत अनुदान देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु या योजनेचा शेतकऱ्यांना लाभ मिळु नये म्हणुन यात ई-पिक पाहणीची जाचक अट टाकण्यात आली आहे. यामुळे जवळपास ९० टक्के शेतकरी हे अनुदानापासुन वंचीत राहणार आहे. यामुळे ही जाचक अटक रद करुन सरसकट सर्वच शेतकऱ्यांना अनुदान देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख यांनी केली आहे. या संदर्भात सलील देशमुख यांनी जिल्हाधीकारी यांना निवेदन सुध्दा दिले.

केंद्र सरकारच्या चुकीच्या आयात निर्यात धोरणा मुळे कापुस व सोयाबीनला बाजारात कवडीमोल भाव मिळाला. विरोधकांनी विधानसभेत शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी लावून धरली होती. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सुध्दा विधानसभेत यासाठी आवाज उठविला होता. यानंतर राज्य सरकारच्या वतीने कापुस व सोयाबीन उत्पादकांना ५ हजार रुपये प्रती हेक्टर अशी दोन हेक्टर पर्यत १० हजार रुपयाची अल्प मदत जाहीर केली होती. ३ वर्षापुर्वी राज्यात जेव्हा मा. उध्दव ठाकरे यांचे सरकार होते तेव्हा कापसाला १४ हजार रुपया पर्यत भाव मिळाला होता. यावर्षी तर केवळ कापसाला ७ हजार रुपयेच भाव मिळाला. यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असतांना केवळ १० हजार रुपयाचीच मदत जाहीर करुन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम राज्यातील भाजपा प्रणित ट्रीपल इंजीन सरकारने केल्याचा आरोप सलील देशमुख यांनी केला.

शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसुन जी १० हजार रुपयाची मदत जाहीर केली त्यात ई-पिक पाहणीची जाचक अट अनुदान देण्यासाठी लावण्यात आली आहे. अनेक शेतकऱ्यांकडे ऑनराईड मोबाईल नाही. यामुळे त्यांनी ई-पिक पाहणीची नोंदनीच केली नाही. यामुळे त्यांचे नाव अनुदान यादीत आले तर नाहीच उलट ज्या शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणीची ऑनलाईन नोंदणी केली त्याचे सुध्दा नाव सुध्दा अनुदान वाटपाच्या यादीत आले नाही. यामुळे राज्यातील मोठया प्रमाणात शेतकरी ट्रीपल इंजीन सरकारने जाहीर केलेल्या अनुदानापासुन वंचीत राहील. एकटया नागपूर जिल्हाचा विचार केला तर तब्बल ९० टक्के शेतकरी हे अनुदानापासुन वंचीत राहतील. एकतर शेतकऱ्यांचे नुकसान होवूनही मदत राज्य सरकार देत नाही. दुसरीकडे शेतकऱ्यांना अनुदान दिल्याच्या नावाखाली जाचक अटी टाकुन शेतकऱ्यांची थट्टा राज्य सरकार करीत आहे. शेतकरी विरोध असलेल्या या सरकारला शेतकऱ्यांना मदतच कराची नसल्याने त्यांनी ई-पिक पाहणीची जाचक अट लावण्याचा आरोपही यावेळी सलील देशमुख यांनी केला.

Tags: ई-पिक पाहणीची जाचक अट रद्द करा सलील देशमुख यांची मागणी. सरसकट अनुदानासाठी जिल्हाधीकाऱ्यांना निवेदन.
Previous Post

स्वातंत्र्यदिनी सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान, नारायण सेवा मित्र परिवाराचे अध्यक्ष महेश अग्रवाल व बेघर आश्रय निवाराचे संचालक अतुल पालांडे सन्मानित.

Next Post

वर्धाचे माजी आमदार सुरेश देशमुख यांच्या अमृत महोत्सवी कार्यक्रम शरद पवार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थिती संपन्न.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
वर्धाचे माजी आमदार सुरेश देशमुख यांच्या अमृत महोत्सवी कार्यक्रम शरद पवार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थिती संपन्न.

वर्धाचे माजी आमदार सुरेश देशमुख यांच्या अमृत महोत्सवी कार्यक्रम शरद पवार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थिती संपन्न.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In