उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- बौद्ध धम्म संस्कार संघ श्रावस्ती विहार सांगलीच्या वतीने भारतीय स्वातंत्र्य दिनाचा 77 वा वर्धापन दिन सकाळी आठ वाजता साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून माजी सैनिक कॅप्टन कुमार कांबळे साहेब आणि माजी सैनिक आनंदा कवठेकर साहेब यांच्या हस्ते ध्वजारोहन करून राष्ट्रगीत होऊन ध्वजारोहणाचा कार्यक्रम उत्साहाने संपन्न झाला. त्यानंतर विहरामध्ये तथागत भगवान बुद्ध, सिम्बॉल ऑफ नॉलेज विश्वरत्न भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन करून बुद्ध धम्म संघ या त्रिरत्न अनुसरून त्रीसरण पंचशील वंदना घेऊन कार्यक्रमात सुरुवात झाली. एस. आर. माने सर यांनी प्रास्ताविक केले. प्रमुख पाहुणे माजी सैनिक कॅप्टन कुमार कांबळे आणि माजी सैनिक आनंदा कवठेकर यांचा सत्कार संस्थेचे सहाय्यक सचिव भारत कदम यांच्या हस्ते आणि कॅप्टन कुमार कांबळे यांचा सत्कार संस्थेचे माजी सचिव प्राध्यापक अशोक भटकर सर यांच्या हस्ते करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून कॅप्टन कुमार कांबळे यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक स्वातंत्र्यवीरांचे योगदान असल्याचे सांगितले. यानंतर विहाराचे संचालक सी .बी. चौधरी यांनी विहाराच्या वतीने 77 व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा आणि मंगल कामना दिल्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान स्वातंत्र्यासाठी मोलाचे असून त्यांना अर्थमंत्री पद आवश्यक होते, परंतु नेहरूंनी कायदामंत्री हे पद दिले. तरीपण भारताचे प्रथम अर्थमंत्री सी.डी. देशमुख हे प्रत्येक सल्ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा घेऊनच अर्थमंत्री पदाचा कार्यभार हाताळीत होते .डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान निर्मितीचे जनक आहेत संविधान मध्ये नमूद असलेल्या तरतुदी मुळेच आपला जो भारत देश आहे तो एक संघ आहे. जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नसते तर या भारत देशाच्या संघ राज्याची छकले झाल्याशिवाय राहिली नसती. हैदराबादचे निजाम हे संस्थानिक मर्ज होण्यास तयार होत नव्हते त्यावर वल्लभाई पटेल यांनी युद्ध करण्याचा पवित्र घेतला होता परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जवळजवळ सहाशे संस्थाने विलीन करण्याचा यांचा सल्ला सरदार वल्लभाई पटेल यांना दिल्यामुळे युद्ध न करता सदर संस्थान ताब्यात घेतलेली आहेत.यावरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे युगपुरुष आणि खरे स्वतंत्र सेनानी आहेत.त्यांना विनम्र अभिवादन करून जय भीम, जय भीम, जय भीम असा जयघोष करून पुन्हा सर्वांना शुभेच्छा देऊन त्यांनी त्यांच्या वाणीच पूर्ण विराम दिला.
यावेळी एस. आर. माने सर यांनी भारतीय राष्ट्रीय ध्वजाच्या तीन रंगाचा अशोक चक्राचा इतिहास आणि त्याचे महत्त्व विशद केले. विहाराचे सह खजिनदार जगन्नाथ आठवले व अध्यक्ष डॉ. सुधीर कोलप यांनी या कार्यक्रमास बिनचूकपणे वेळेमध्ये उपस्थित राहिलेले सर्वांचे आभार मानून उपस्थितीत चांगली असल्याबाबत समाधान व्यक्त केले. तसेच दुपारी चार ते सहा या दरम्यान वर्षावास पावन पर्व निमित्त महाथेंरो डॉ. यश काशीपायन यांची धम्मदेशना असल्याने सर्वांनी दुपारच्या सत्रा मध्ये उपस्थित राहणे बाबत विनंती करून कार्यक्रमाची सांगता केली सदर कार्यक्रमास भारत कदम सहसचिव, प्राध्यापक अशोक भटकर, पारमित धमकीर्ती, अशोक वाघमारे, विजय लांडगे, राहुल विश्वनाथ कांबळे, संस्थेच्या उपाध्यक्ष सुनिता धम्मकीर्ती, संचालिका उषा कांबळे, दीपा कांबळे, तसेच सदस्य आशा चौधरी, सविता चौधरी, सुजाता घाडगे वहिनी इत्यादी महिलावर्ग उपस्थित होत्या.
भारतात राष्ट्रीय ध्वज तिरंगा आणि त्यामध्ये असलेले अशोक चक्र महत्व व त्याचे पावित्र्य याबाबत सविस्तर माहिती सांगितली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे राष्ट्रनिर्माते आणि त्यांची चळवळ स्वातंत्र्य समता बंधुता आणि सामाजिक न्याय यावरच आधारित आहे ग दि माडगूळकर यांचे कवितेमध्ये हा चंद्र सूर्य तळपत राहो स्वातंत्र्य भारताचे हे वाक्य सर्वकाही सांगून जाते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीचे ध्यान हे बीज आहे. ध्यान प्रत्यक्ष कृतीची व अनुभवाची बाब आहे, जगातील प्रत्येक व्यक्ती काहीतरी शोधत आहे पण आपण काय शोधत आहोत हे माहीत नाही. सर्व जाती-धर्माच्या लोकांना ध्यान आकर्षित करत आहे. मन कुठल्याही धर्माशी निगडित नसते. ध्यान मनाला समजावून घेऊन त्याचा जीवनात कसा वापर करावा हे सांगते. सुख दुःखांची गुरु किल्ली “मन” आहे कुशल चित्ताच्या एकाग्रते मधून निर्माण होणारी जागृतता म्हणजे ध्यान होय.
बौद्ध धर्माचा केंद्रबिंदू मनुष्य आहे. माणसाचे मन हे सर्व संस्काराचे उगमस्थान आहे. नाक, कान, डोळा, जीभ, त्वचा, मन या सहा इंद्रियांमध्ये संस्कार निर्माण होतात. आनापान सती ही अतिशय शांतपणे नैसर्गिक श्वासोस्वासाकडे जागरूकतेने पाहणे श्वास आत येत आहे बाहेर जात आहे यावर आपले लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. आपले शरीर हे पृथ्वी आप तेज वायू या चार घटकांनी बनलेले आहे. भगवान बुद्ध सत्तीपठाण सुतामध्ये सांगतात जागृतते मधून बुद्ध प्राप्त होते. कुशल चित्ताच्या एकाग्रतेमधून निर्माण होणारी जागृतता म्हणजे ध्यान होय. ध्यानाच्या साह्याने मन एकाग्र करता येते. एकाग्रतेमुळे मन शांत व स्थिर होते.
बौद्ध धम्माचा केंद्रबिंदू मनुष्य आहे. माणसाचे मन हे सर्व संस्काराचे उगमस्थान आहे. अशाप्रकारे सविस्तर माहिती सांगितली. संजय घाडगे सर संचालक यांनी प्रास्ताविक केले. विहाराचे सहाय्यक खजिनदार जगन्नाथ आठवले यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली. त्याचप्रमाणे रविवारच्या वर्षावास कार्यक्रमाच्या निमित्ताने सकाळी दहा ते अकरा या वेळेत संजय घाडगे सर संचालक हे बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथाचे वाचन करून स्पष्टीकरण देणार आहे त्यामुळे सर्व उपासक माता बंधू भगिनी यांनी बिनचूकपणे पांढरे स्वच्छ कपडे परिधान करून उपस्थित रहावे अशी विनंती केली.