प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- काेलकात्यातील आर. जी. कर वैदयकीय महाविदयालयातील दुसऱ्या वर्षाला शिकणाऱ्या विदयार्थिनीवर अत्याचार आणि तिची निर्घृण हत्या केल्याच्या निषेधार्थ हिंगणघाट येथे मेडिकल असाेसिएशन ने एकदिवशीय सेवाबंद संप पुकारला आहे. हा संप (दि. १७) राेजी शनिवारी संपूर्ण शहरात पाळण्यात आला. त्यात शहरातील सर्व डॉक्टरांनी निषेध नोंदवत उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिले. त्यात सर्व डॉक्टरांनी आपल्या रुग्णालयातील ओपिडी बंद ठेवल्या त्यामुळे शहरातील अनेक रुग्णाला त्रास सहन करावा लागला आहे.
काेलकात्यामधील महिला डाॅक्टरावर अत्याचार व हत्या प्रकरणामुळे देशभरात डाॅक्टर कम्युनिटी कडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. डाॅक्टरांना सुरक्षा पुरवणे हे शासनाचे काम आहे. महिला डाॅक्टर नेहमीच अशा अत्याचाराला बळी पडण्याची शक्यता असते. अशा घटनांच्या विराेधात देशभरातील सर्वच डाॅक्टर समुदाय आंदाेलने करत आहे. त्यामुळे आज एक दिवस हा संप पुकारण्यात येत आहे. तरी अशा नराधम आरोपीला कडक कारवाई करून शिक्षा मिळाली पाहिजे असे यावेळी डॉक्टर असाेसिएशन कडून मागणी करण्यात आली. यावेळी हिंगणघाट शहरातील सर्व गणमान्य डॉक्टर उपस्थित होते.