पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपुर
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- नागपूर शहरातील कपिल नगर पोलीस स्टेशन येथे पोलिसांना राखी बांधून राखी पौर्णिमा साजरी करण्यात आली. नागरिकांनी सण-उत्सव उत्साहात आणि सुरक्षित साजरे करण्यासाठी पोलिस रात्रंदिवस रस्त्यावर असतात. त्यामुळे सणासुदीत त्यांना सुटी मिळत नाही. कर्तव्यावर असल्याने बहुतांश पोलिसांना रक्षाबंधन साजरा करता येत नाही.
एकीकडे अवघ्या शहरात रक्षाबंधनाच्या उत्सव सुरू असताना दुसरीकडे राखी न बांधताच पोलिस आपले कर्तव्य पार पाडत होते. त्यामुळे कपिल नगर पोलीस स्टेशन येथील सर्व पोलिस अधिकारी आणि कॉन्स्टेबल यांना महिलांनी राखी बांधून ओवाळले. यावेळी महिलानी बांधलेल्या राख्यांमुळे पोलिसांनी आनंद व्यक्त केला.